AR Rahman Daughter Engagement : ए.आर.रेहमानच्या मुलीचा साखरपुडा संपन्न; कोण आहेत रेहमानचे जावई?
खतीजा रेहमानचा (Khatija Rahman) साखरपुडा नुकताच पार पडला.

Khatija Rahman Engagement : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमानच्या (AR Rahman) मुलाचा म्हणजेच खतीजा रेहमानचा (Khatija Rahman) साखरपुडा नुकताच पार पडला. खतीजाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या साखरपुड्याबद्दल नेटकऱ्यांना माहिती दिली. जाणून घेऊयात कोण आहे एआर रेहमान यांचा होणारा जावई...
खतीजाची पोस्ट
खतीजाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली. तिने पोस्ट शेअर करत लिहिले, 'मला तुम्हा सर्वांना हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की रियासद्दीन शेख मोहम्मद यांच्यासोबत माझा साखरपुडा पार पडला आहे. रियासद्दीन हे ऑडियो इंजीनियर आहेत. रियासद्दीन आणि माझा साखरपुडा 29 डिसेंबरला पार पडला. माझे कुटुंब आणि मित्रमैत्रीणी या सोहळ्याला उपस्थित होते. ' खतिजाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती पिंक कलरचा ड्रेस आणि स्टोनचे दागिने अशा लूकमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
खतीजा गायिका आहे. तिने कृती सेननच्या मिमी या चित्रपटातील एक गाणे गायले आहे. या चित्रपटाला एआर रेहमान यांनी संगीत दिले आहे.
संबंधित बातम्या
Malaika Arora And Arjun Kapoor : मलायकाला येते अर्जुनची आठवण; फोटो शेअर करत म्हणाली...























