एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक नीरज व्होरा कोमामध्ये

नीरज व्होरा यांना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमात गेल्याची माहिती आहे.

मुंबई : प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा गेल्या दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. बॉलिवूडमधला या प्रसिद्ध चेहऱ्याच्या प्रकृतीबाबत सध्या मात्र कोणाकडे फारशी माहिती नाही. त्यांचा आगामी चित्रपट 'हेराफेरी 3' होल्डवर ठेवण्यात आला आहे. नीरज व्होरा यांना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमात गेल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला त्यांना हार्ट अटॅक आला होता. 'एम्स'मध्ये दाखल केल्यानंतर 'दीर्घकाळापासून कोमात असलेला रुग्ण' अशी त्यांची नोंद करण्यात आली. निर्माते फिरोझ नादियाडवाला यांच्या जुहूमधील बरकत व्हिलामध्ये व्होरा यांना हलवण्यात आलं. 11 मार्चपासून नादियाडवालांच्या घरातील एका रुमचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रुममधल्या भिंतींवर व्होरांच्या सिनेमांची पोस्टर्स आणि डीव्हीडीज लावण्यात आल्या आहेत. कंपनी, पुकार, रंगीला, सत्या, बादशाह, मन यासारख्या 90 च्या दशकातील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये नीरज व्होरा झळकले होते. अकेले हम अकेले तुम, रंगीला, चोरी चोरी चुपके चुपके, जोश, बादशाह, हेरा फेरी, आवारा पागल दिवाना यासारखे अनेक चित्रपट त्यांच्या लेखणीतून उतरले. तर फिर हेरा फेरी, खिलाडी 420 सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. व्होरा यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी 24 तास नर्स, वॉर्डबॉय असतात. फिजिओथेरपिस्ट, न्युरोसर्जन, अॅक्युपंक्चर थेरपिस्ट आणि जनरल फिजीशियन दर आठवड्याला भेट देतात. व्होरा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे लवकरच ते बरे होतील, अशी आशा त्यांच्या मित्रांना वाटते. नीरज व्होरा यांच्या पत्नीचं काही काळापूर्वी निधन झालं. व्होरा यांना अपत्य नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलंSatej Patil On Madhurima Raje Withdrawn : आता वाद निर्माण करायचा नाही, कालच्या विषयावर पडदा टाकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget