Saas Bahu Aur Flamingo Poster: 'सास बहू और फ्लेमिंगो' सीरिजचं पोस्टर रिलीज; डिंपल कपाडियाचा खतरनाक लूक
'सास बहू और फ्लेमिंगो' (Saas Bahu Aur Flamingo) या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) काम करणार आहे.

Saas Bahu Aur Flamingo Poster: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. डिंपलच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता 'सास बहू और फ्लेमिंगो' (Saas Bahu Aur Flamingo) या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया काम करणार आहे. या सीरिजचे पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये डिंपल कपाडिया खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या सीरिजबद्दल उत्सुकता वाढली आहे. 'सास बहू और फ्लेमिंगो' च्या या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
डिस्ने प्लस हॉटस्टारच्या इंस्टाग्राम अकाऊंवर 'सास बहू और फ्लेमिंगो' सीरिजचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये डिंपल कपाडिया ही हातात बंदूक घेऊन कोणावर तरी निशाणा साधताना दिसत आहे. पोस्टरवर लिहिले आहे, 'सर्व गन संपन्न'. डिंपल कपाडियाचा या लूकची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 'स्वागत करो राणी बा सावित्री देवी का.' असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी या पोस्टरला कमेंट करुन डिंपल कपाडियाच्या या लूकचं कौतुक केलं आहे.
मॅडॉक फिल्म्स निर्मित 'सास बहू और फ्लेमिंगो' या सीरिजमध्ये डिंपल कपाडिया व्यतिरिक्त आशिष वर्मा (Ashish Verma), वरुण मित्रा, उदित अरोरा, दीपक डोबरियाल आणि मोनिका डोगरा (Monica Dogra) या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 'सास बहू और फ्लेमिंगो' चे दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केले आहे. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर 5 मे 2023 रोजी रिलीज करण्यात येणार आहे.
पाहा पोस्टर:
View this post on Instagram
डिंपल कपाडियाचे चित्रपट
डिंपलनं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिल चाहता है,बॉबी, हम कौन है,प्यार मे ट्विस्ट, फिर कभी,तुम मिलो तो सही, बिईॅंग सायरस,लक बाय चान्स,दबंग, पटियाला हाऊस आणि कॉकटेल यांसारख्या चित्रपटांमध्ये डिंपलनं काम केले. आता तिच्या 'सास बहू और फ्लेमिंगो' या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
