Priyanka Chopra: देसी गर्ल आणि WWE सुपरस्टार एकत्र करणार काम; प्रियांका आणि जॉन सीना यांचा ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
आता लवकरच प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही WWE सुपरस्टार जॉन सीनासोबत (John Cena) एका चित्रपटात काम करणार आहे.
Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सध्या तिच्या 'सिटाडेल' (Citadel) या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे. प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजक्ट्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता लवकरच ती एका आगामी चित्रपटामध्ये WWE सुपरस्टार जॉन सीनासोबत (John Cena) काम करणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘हेड्स ऑफ स्टेट’ (Heads Of State ) असं आहे. ‘हेड्स ऑफ स्टेट’ या चित्रपटाबद्दल नुकतीच जॉन सीनानं एक पोस्ट शेअर केली आहे.
WWE सुपरस्टार जॉन सीनाने ट्विटरवर एक ट्वीट शेअर करुन ‘हेड्स ऑफ स्टेट’ चित्रपटाची घोषणा केली आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, "अशी ड्रीम टीम तयार केल्याबद्दल अॅमेझॉन स्टुडिओचे आभार. मी इदरीस एल्बासोबत हेड्स ऑफ स्टेटवर काम करण्यास उत्सुक आहे आणि मी या प्रोजेक्टमध्ये जगप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचे स्वागत करतो.'
THANK YOU @AmazonStudios for assembling such a dream team. Excited to get to work on #HeadsOfState with @idriselba and welcome the newest cast member, the world renowned @priyankachopra! https://t.co/McASWF8jtC
— John Cena (@JohnCena) April 5, 2023
जॉन सीनाच्या या ट्वीटला प्रियांकानं रिप्लाय दिला, एवढं छान स्वागत केल्याबद्दल मी जॉन सीनाचे आभार मानते. मी या चित्रपटाच्या सेटवर येण्यास उत्सुक आहे.'
Thank you for the warm welcome @JohnCena I can’t wait to get to set! let’s gooooo ❤️@AmazonStudios #headsofstate @idriselba https://t.co/WNwBPivTSz
— PRIYANKA (@priyankachopra) April 5, 2023
प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज 28 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'सिटाडेल' ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. प्रियांकाच्या या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. प्रियांका ही ‘जी ले जरा’या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहान अख्तर करणार आहे. तसेच कतरिना कॅफ आणि आलिया भट या अभिनेत्री या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: