एक्स्प्लोर

Dharavi Bank: 'धारावी बँक' रसिकांच्या भेटीला; सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टी,विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत

'धारावी बँक' (Dharavi Bank) या सीरिजमध्ये सुनील शेट्टी, सोनाली कुलकर्णी, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Dharavi Bank: काही कलाकारांमुळे प्रेक्षकांचं सिनेमाकडे लक्ष वेधलं जातं, तर काही दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शक समित कक्कड हे आज मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील एक असं नाव बनलं आहे, ज्याची कलाकृती म्हणजे नावीन्यपूर्ण विषयाची जणू खात्रीच. आजवरच्या आपल्या कामाद्वारे समितनं रसिकांसोबतच सिनेसृष्टीचंही मन जिंकलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या समितच्या '36 गुण' या चित्रपटाचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच कौतुक केलं आहे. कायम वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती बनवण्याला प्राधान्य देणारा समित रोमँटिक सिनेमानंतर अंडरबेलीवर प्रकाश टाकणारी 'धारावी बँक' हिंदी वेब सिरीज घेऊन आला आहे. 

कोणत्याही विषयाचे अत्यंत बारकाईनं संशोधन करून मगच आपल्याला उमगलेलं चित्र पडद्यावर सादर करायचं हे समितच्या यशाचं गमक असल्याचं त्याच्या आजवरच्या प्रवासावर नजर टाकल्यावर अगदी सहजपणे लक्षात येतं. 'हुप्पा हुय्या' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीनंतर 'आयना का बायना'मध्ये समितनं एका वेगळ्याच विषयावर भाष्य केलं होतं. 'हाफ तिकिट' या चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या सिनेमहोत्सवांमध्ये बाजी मारली होती. आश्चर्यचकित हा सिनेमाही वेगळ्या विषयावरील होता. '36 गुण'च्या प्रदर्शनानंतर सर्वांनाच समितच्या 'धारावी बँक' या वेब सिरीजची प्रतीक्षा होती. 

समितनं मुंबईतील अंडरबेलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला आहे. धारावी म्हणजे केवळ एक भली मोठी झोपडपट्टी नसून, तिथं राहणाऱ्या प्रत्येक घटकानं तिला आशियातील पहिल्या क्रमांकाची झोपडपट्टी बनवलं आहे. घरदार नसल्यानं रस्त्यावर झोपणारेही इथे आहेत आणि झोपड्यांचे तीन-चार मजली टॅावर उभारणारे माफियाही आहेत. सुसंस्कृत लोकांच्या विश्वापेक्षा धारावीतील जग खूप वेगळं आहे. या सर्व गोष्टींचा समितनं खूप रिसर्च केला आहे, ज्याचा खूप फायदा त्याला 'धारावी बँक' बनवताना झाला. समित च्या मते मुंबईतील सुंदर ठिकाण म्हणजे धारावी. समित याच बालपण याच परिसरात गेल्याने हे सगळं त्यांनी जवळून अनुभवलं आहे. एमएक्स प्लेअरची ही ओरिजनल सिरीज आहे. 'धारावी बँक'मध्ये एक वेगळं जग पहायला मिळणार आहे.
 
आतापर्यंत असंख्य सिनेमांमध्ये अंडरवर्ल्ड आणि प्रशासनाचा सामना सर्वांनीच पाहिला आहे, पण या दरम्यानच्या अनेक गोष्टी कधीच समोर आल्या नव्हत्या. त्या सर्व बारीकसारीक गोष्टी 'धारावी बँक'मध्ये पहायला मिळणार आहेत. धारावीतील व्यवहार कसे चालतात, कशाप्रकारे इथली व्यवस्था सुरू असते, पोलिसांचे खबरी कसे काम करतात, अंडरवर्ल्डचे धागेदोरे कसे जोडलेले आहेत आणि एकूणच मुंबईतील अंडरबेलीचा उल्लेख या वेब सिरीजमध्ये आहे. या वेबसीरिजची निर्मिती झी स्टुडियोची आहे. एमएक्स प्लेअरचे चीफ कंटेट ऑफिसर गौतम तलवार तर सीनियर क्रिएटीव्ह प्रोड्यूसर पेरसी जामशेदजी आहेत.

'धारावी बँक'मध्ये ‘थलाईवन’च्या भूमिकेत अभिनेता सुनील शेट्टी आहे, तर त्याच्या मागावर असलेला जेसीपी जयंत गावस्कर हा पोलीस अधिकारी बनलाय अभिनेता विवेक ओबेरॅाय.  सोनाली कुलकर्णी, नागेश भोसले, फ्रेडी दारूवाला, सिद्धार्थ मेनन, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, जयवंत वाडकर शांती प्रिया, ल्यूके किनी, वामशी कृष्णन, भावना राव, समीक्षा भटनागर, श्रुती श्रीवास्तव, हितेश भोजराज, पवित्रा सरकार, रोहित पाठक आदी कलाकार 'धारावी बँक' या वेब सिरीजमध्ये आहेत. या वेब सीरीजचे लेखन सार्थक दास गुप्ता यांचे आहे. छायांकन विजय मिश्रा तर संकलन आशीष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले सहाय यांचे आहे. अॅक्शन विक्रम दहिया तर वेशभूषेची जबाबदारी किन भाटिजा यांनी सांभाळली आहे. प्रोडक्शन डिझाईन वाडिया खान, राकेश यादव, तर बीजीएम अमर मोहिले यांनी केले आहे. कास्टिंग कुणाल शहा तर व्हीएफएक्स पंकज अजवानी यांचे आहे. साउंड डिझायनिंग आणि मिक्सिंग अजय कुमार पीबी यांचे आहे. 19 नोव्हेंबरला एमएक्स प्लेअरवर 'धारावी बँक' स्ट्रीम झाली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 21 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Kalyan Loksabha News : कल्याण मतदारसंघात कुणाचं पारडं जड? कोण मारणार बाजी? कल्याणकरांचं मत कुणाला?Uddhav Thackeray On Police : कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिसांना सोडणार नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोलVibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Kiran Mane :  मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
मराठी सिनेसृष्टीत लॉबी आहे? किरण मानेंचं सडेतोड उत्तर, मी त्याला डबकं म्हणतो...
Monsoon Update : आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
आनंदाच्या सरी पोहोचल्या काही तासांच्या अंतरावर; केरळसह राज्यात मान्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदाज
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
Embed widget