एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’ला राज्यभरात 225 स्क्रीन!

मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला.

मुंबई : मनसेच्या इशाऱ्यानंतर ‘देवा’चित्रपटाला महाराष्ट्रभरात 225 स्क्रीन मिळणार आहे. स्क्रीन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर थिएटर मालकांनी ‘देवा’लाही स्क्रीन देण्याचा निर्णय घेतला. उद्या (शुक्रवार) राज्यभरातील 225 स्क्रीनवर 'देवा’ रिलीज होणार आहे. ‘देवा’ चित्रपटाला 225 स्क्रीन मिळाल्या असल्या तरी फारच कमी ठिकाणी प्राईम टाईम मिळाला आहे. त्यामुळे आता मनसे प्राईम टाईमचा विषय लावून धरणार की, माघार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यशराज’ची मुजोरी खपवून घेणार नाही, ‘देवा’साठी मनसे आक्रमक दरम्यान, काल (बुधवार) मनसेनं या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेऊन यशराज फिल्म्सला सज्जड दमही भरला होता. ‘यशराज फिल्म्सच्या सिनेमांची शूटिंग महाराष्ट्रातही होते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. मुजोरी खपवून घेणार नाही’, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सुनावलं होतं. ‘टायगर जिंदा है’ सिनेमामुळे ‘देवा’ सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नसल्याने मनसे आता आक्रमक झाली होती. यशराज फिल्म्सची दादागिरी चालू देणार नाही. मुजोरीला उत्तर देणार. चर्चेतून प्रश्न सुटला तर ठीक, नाहीतर महाराष्ट्रात यशराजची शूटिंग होऊ देणार नाही, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला होता. ‘मराठी चित्रपटांना आपल्याच राज्यात स्क्रीनिंगसाठी भीक मागावी लागते, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आमचा ‘टायगर जिंदा है’ सिनेमाला विरोध नाही, यशराजच्या दादागिरीला विरोध आहे.’ असंही खोपकर यावेळी म्हणाले होते. काय आहे प्रकरण? अभिनेता सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ आणि मराठीतील ‘देवा’ आणि ‘गच्ची’ हे 'टायगर जिंदा है'चे शो हवे असतील तर थिएटरमधले 95 टक्के शो हे आम्हाला द्यायला हवेत, असा सज्जड दम या चित्रपटाकडून थिएटर ओनर्स, वितरक यांना भरण्यात आला आहे. यशराजसारखा मोठा बॅनर असल्यामुळे त्यांच्या हो ला हो करणं थिएटरवाल्यांच्या हातात आहे. 'देवा'च्या टीमला ही गोष्ट कळल्यावर त्यांनी थेट मनसेचा रस्ता धरला. नेमका काय आहे वाद? येत्या शुक्रवारी 'गच्ची' आणि 'देवा' हे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर त्यांच्यासमोर हिंदीत उभा ठाकतोय सलमान खानचा 'टायगर जिंदा है'. बऱ्याच दिवसांनी हिंदीत बिग बजेट सिनेमा येत असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही कंबर कसली आहे. मात्र सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ या सिनेमामुळे मराठी चित्रपट देवा आणि गच्ची यांना थिएटर्स मिळणं कठीण झालं आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे प्रत्येक स्क्रिनवर 5 खेळ लावा, असा मेल यशराज फिल्म्सने सर्व थिएटर मालकांना केला आहे. त्यामुळे  देवा आणि गच्ची सारख्या मराठी चित्रपटांना थिएटर न मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवाची मनसेकडे धाव या प्रकारामुळे ‘देवा’च्या निर्मात्यांनी मनसेकडे धाव घेतल्यानंतर मनसेने देवाला जागा देण्यास थिएटर मालकांना बजावलं आहे. ‘देवा’च्या टीमने मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांची भेट घेतली. यानंतर देवा या मराठी चित्रपटाला थिएटर न मिळाल्यास मनसे स्टाईनने आंदोलनाचा इशारा मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी दिला आहे. नितेश राणेंचा इशारा दरम्यान, या वादात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली. महाराष्ट्रात ‘देवा’ ला मारुन टायगर जिंदा राहत असेल, तर ते थिएटरर्स ना कुठलाच टायगर वाचू शकणार नाही!!  असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिला आहे. महाराष्ट्र मध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहीजे, असंही त्यांनी निक्षून सांगितलंय. संजय राऊत "देवा"चं काय. प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे., असं ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. संबंधित बातम्या : ‘यशराज’ची मुजोरी खपवून घेणार नाही, ‘देवा’साठी मनसे आक्रमक

सलमानच्या 'टायगर'ला सुरक्षा द्या, मनसेच्या गुंडांना रोखा: संजय निरुपम 'टायगर'विरोधात 'देवा' राज ठाकरेंच्या दरबारात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur Shivrajyabhishek 2024 : शाहू महाराजांच्या उपस्थितीत पार पडतोय शाही शिवराज्याभिषेक सोहळाAjit Pawar NCP Election Result 2024 : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पराभवानंतर अस्वस्थता?Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार; पंतप्रधान मोदी, अमित शाह यांची भेट घेणारABP Majha Headlines : 09 AM : 06 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; शरद पवार गटात परतण्याच्या चर्चांना उधाण
अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता; घरवापसीच्या चर्चांना उधाण
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत, पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी वन टू वन संवाद; चुका सुधारण्याचा सल्ला
Sunil Lahri on BJP Ayodhya : अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
अयोध्येत भाजपचा पराभवाने 'रामायण'मधील लक्ष्मणचा संताप, हिंदू समुदाय म्हणजे....
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
मुख्यमंत्र्यांचा गड भेदला, अवघ्या 25 व्या वर्षी खासदार; कोण आहेत संजना जाटव ज्यांची होतेय देशभरात चर्चा!
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, कोकणासह मध्य महाराष्ट्रात सरी; मान्सून कधी येणार?
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
Embed widget