एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नीरज पांडेंच्या 'अय्यारी'ला संरक्षण मंत्रालयाची हरकत
आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्याचं म्हटलं जातं.
![नीरज पांडेंच्या 'अय्यारी'ला संरक्षण मंत्रालयाची हरकत Defence Ministry asked for a screening of Aiyaary before Censor board latest update नीरज पांडेंच्या 'अय्यारी'ला संरक्षण मंत्रालयाची हरकत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/02/02172745/Aiyaary.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : 'पद्मावत'नंतर आता नीरज पांडे यांच्या 'अय्यारी' चित्रपटामागे शुक्लकाष्ठ लागलं आहे. सेन्सॉर बोर्ड अय्यारीला क्लीन चिट देण्यास काचकूच करत आहे. संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्यामुळे त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय सेन्सॉर बोर्ड सर्टिफिकेट देणार नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी यांची मुख्य भूमिका असलेला अय्यारी चित्रपटाचं कथानक लष्करातील भ्रष्टाचारावर आधारित आहे.
यामुळे संरक्षण मंत्रालयाने सिनेमाबाबत चिंता व्यक्त केली आहे. चुकीच्या गोष्टी दाखवल्या जाण्याच्या भीतीमुळे संरक्षण मंत्रालयाने सिनेमा पाहण्या आधीच अय्यारीच्या रिलीजला आडकाठी केल्याची माहिती आहे.
आपल्या प्रतिनिधींनी सिनेमाला मंजुरी दिल्याशिवाय सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देऊ नये, असं सांगत संरक्षण मंत्रालयाने हरकत घेतल्याचं म्हटलं जातं.
बॉक्स ऑफिसवर पुन्हा क्लॅश, 'अय्यारी'चं 'पॅडमॅन'ला ट्वीट
अय्यारी हा चित्रपट सुरुवातीला 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र त्याच दिवशी पद्मावत आणि पॅडमॅन यासारखे दोन तगडे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आमनेसामने आल्याने अय्यारीने आपली रिलीजिंग डेट 9 फेब्रुवारीला हलवली. सिनेमाचं प्रदर्शन अवघ्या आठवड्याभरावर आल्यामुळे निर्माते धास्तावले आहेत.प्रजासत्ताक दिनी अक्षयच्या 'पॅडमॅन'ची नीरज पांडेशी टक्कर
अय्यारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज वाजपेयी गुरु-शिष्याच्या भूमिकेत आहेत. तर अनुपम खेर, नसीरुद्दीन शाह, राकुल प्रीत सिंह, कुमुद मिश्रा, पूजा चोप्रा, आदिल हुसैन आणि विक्रम गोखले यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपटालाही अशाच विरोधाचा सामना करावा लागला होता. अखेर नावातील 'आय' हे अक्षर काढून, घुमर चित्रपटात दीपिका कंबर झाकून, डिस्क्लेमर जारी केल्यावर हा सिनेमा 25 जानेवारीला रीलिज झाला.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)