एक्स्प्लोर
बाळासाहेबांच्या चरित्रपटात मुख्य भूमिकेत कोण?
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रपटासाठी कलाकारांची निवड जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र सिनेमातील कलाकारांची नावं सध्यातरी गुलदस्त्यात ठेवणार असल्याचं निर्मात्या स्मिता ठाकरे यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या चरित्रपटाचं दिग्दर्शन स्मिता ठाकरे यांचा मुलगा राहुल ठाकरे करणार आहे.
स्मिता ठाकरे म्हणाल्या की, "पटकथा पूर्ण झाल्यावर आम्ही व्यक्तिरेखेनुसार कलाकारांची निवड करणार आहोत. आम्ही त्याच कलाकारांना संधी देणार आहोत, जे त्या व्यक्तीरेखेला न्याय देतील. मात्र यात नवीन कलाकार असतील की लोकप्रिय कलाकार याचा खुलासा आम्ही करणार नाही. पण बऱ्याच कलाकारांची निवड झाली आहे."
"आम्हाला कलाकारांची गुप्तता ठेवायची आहे. जेव्हा सिनेमा तयार होईल, त्यावेळी आम्ही कलाकारांना योग्यरित्या सगळ्यांसमोर आणू," असं राहुल ठाकरे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या चरित्रपटाची घोषणा मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केली होती. स्मिता ठाकरेशिवाय ‘मेरी कोम’चे दिग्दर्शक उमंग कुमा आणि त्यांच्यासोबत ‘सरबजीत’चे निर्माते संदीप सिंह देखील बाळासाहेब ठाकरेंच्या चरित्रपटाचे निर्माते असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement