(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss : इतकी वर्षे टिकलेलं हे माझ्या आयुष्यातील एकमेव रिलेशनशीप; सलमान खानचा खुलासा
Bigg Boss : सलमान खानने (Salman Khan) त्याच्या इतक्या वर्षांपासून सुरु असलेल्या रिलेशनशीपवर एक खुलासा केला आहे. काही नाती ही अशी असतात जी टिकवायची असतात असंही सलमान खानने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खानने (Salman Khan) आपल्या एका आगळ्या-वेगळ्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. 'बिग बॉस' (Bigg Boss) हे आपल्या आयुष्यातील दहा वर्षे टिकलेलं हे एकमेव रिलेशनशीप असल्याचं त्याने म्हटलं आहे. सलमान खान आणि बिग बॉस या रियालिटी शोचं नातं हे 2010 सालापासूनचं आहे. सलमान खान आता बिग बॉसच्या 15 सीझनचा होस्ट असणार आहे.
एका कार्यक्रमात व्हिडीओच्या माध्यमातून संवाद साधताना सलमान खान म्हणाला की, "बिग बॉस सोबतचं माझं नातं हे कदाचित सर्वात जास्त काळ टिकलेलं नातं आहे. काही नाती ही अशी असतात जी टिकवायची असतात."
बिग बॉस या कार्यक्रमाने आपल्या जीवनात काही प्रमाणात स्थिरता आणल्याचं सलमान खान म्हणाला. या चार महिन्याच्या कालावधीत आम्ही एकमेकांना थेट भेटू शकत नाही पण बिग बॉस शो संपत आल्यावर आमच्यामध्ये एक प्रकारचा बॉन्ड निर्माण झाल्याचं जाणवतं असंही सलमान खान म्हणाला.
संगीती बिजलानीसोबतच्या अफेअरची पुन्हा चर्चा
सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या एकेकाळच्या अफेअरची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्याचं दिसतंय. संगीताने आपण अजूनही सलमानच्या संपर्कात असल्याची कबुली दिलीय. अलिकडेच एका शो मध्ये संगीता बिजलानी सलमान खानसोबतच्या नात्यावर म्हणाली की, "काही नाती ही कायमची जोडली असतात. दोस्ती की है, तो निभानी तो पडेगी ही."
सलमान खान सध्या त्याच्या टायगर 3 या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून त्यासाठी तो ऑस्ट्रियाला गेला आहे.
संबंधित बातम्या :