Bollywood Actor : अमिताभ बच्चन ते राजेश खन्ना; 'या' चिमुकल्याने बॉलिवूडकरांच्या बालपणीच्या भूमिकांना दिलाय न्याय; आता करतोय 'हे' काम
Bollywood Actor : बॉलिवूडच्या लोकप्रिय बालकलारांमध्ये मास्टर राजूचा समावेश होतो. या बालकलाकाराने 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपट देत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
Bollywood Actor : चित्रपटांमध्ये (Movies) आजवर तुम्ही अनेक सुपरस्टार्स पाहिले आहेत. सुपरस्टारमुळे तो चित्रपट यशस्वी होत असतो आणि कमाईचे रेकॉर्ड्स ब्रेक करतो. पण काही चित्रपटांमध्ये अनेक बड्या कलाकारांसह बालकलाकारदेखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. मास्टर राजू या बालकलाकाराचाही यात समावेश आहे. मास्टर राजूने राजेश खन्नाच्या बावर्ची, अभिमान आणि परिचयसारख्या चित्रपटांसह 90 च्या दशकातील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
पटकावलाय सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार
राजू श्रेष्ठ अमिताभ बच्चन आणि राजेश खन्नाच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. त्याने बावर्ची, परिचय, अभिमान आणि चितचोरसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही राजूने पटकावला आहे.
मनोज वाजपेयीने केलं कौतुक
अभिनेता राजू श्रेष्ठच्या एका पोस्टवर लोकप्रिय अभिनेता मनोज वाजपेयीने कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. मास्टर राजूने 1978 मध्ये 'त्रिशूल' या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं,"या चित्रपटात मी अमिताभ बच्चन यांची बालपणीची भूमिका साकारली होती. एका मोठ्या चित्रपटात छोटी भूमिका". राजूच्या या पोस्टवर मनोज वाजपेयीने कमेंट केली होती,"चित्रपटात चांगलं काम केलं होतंस...तू माझ्या आवडत्या पात्रांपैकी एक होतास". मनोजने राजूच्या अभिनयाचं कौतुक केलं होतं.
View this post on Instagram
आजही इंडस्ट्रीत सक्रीय
राजू श्रेष्ठ आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. इंस्टाग्रामवरील त्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तो शक्ति कपूरसोबत दिसून येत आहे. चित्रपटांसह राजू श्रेष्ठ जय हनुमान, सीआयडी, अदालत आणि भारत का वीर पुत्र-महाराणा प्रतापसारख्या मालिकांमध्ये दिसून आला आहे. राजू श्रेष्ठच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
राजू श्रेष्ठ मास्टर राजू म्हणून इंडस्ट्रीत ओळखला जातो. 1970 मध्ये त्याने बालकलाकार म्हणून पदार्पण केलं. परिचय, बावर्ची, दाग:अ पोएम ऑफ लव्ह, चितचोर, किताब यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. बॉलिवूडच्या 200 चित्रपटांचा तो भाग आहे.
संबंधित बातम्या