(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Atharva Sudame: 'व्हॅलेंटाईन-डे' च्या व्हिडीओमुळे बदललं आयुष्य; विनोदी हावभावानं जिंकली नेटकऱ्यांची मनं, जाणून घ्या राज ठाकरेंचा आवडता रिल स्टार अथर्व सुदामेबद्दल...
Atharva Sudame: विनोदी आणि ओरिजनल कंटेन्ट अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा सोशल मीडियावर शेअर करत असतो. अथर्व हा त्याच्या विनोदी शैलीनं नेटकऱ्यांची मनं जिंकतो.
Atharva Sudame: सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर विविध कंटेन्ट लोक शेअर करतात असतात. आपला कंटेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा, अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी क्वालिटी आणि ओरिजनल कंटेन्ट क्रिएट करणं आवश्यक असते. असाच विनोदी आणि ओरिजनल कंटेन्ट अथर्व सुदामे (Atharva Sudame) हा सोशल मीडियावर शेअर करत असतो. अथर्व हा पुण्याचा प्रसिद्ध रिल स्टार आहे. अथर्वचे रिल्स देशातील तसेच परदेशातील लोक देखील आवडीनं बघतात. जाणून घेऊयात अथर्व सुदामेच्या बालपणाबद्दल....
अथर्व सुदामेनं जोश Talks या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या बालपणाबद्दल सांगितलं. तो म्हणाला, "शाळा मला अजिबात आवडायची नाही. शाळेत गेलो की, मी रडत होतो. शाळेतील मुलं माझी वाट बघायची. ते असा विचार करत होते की, हा आला की रडायला सुरुवात करेल आणि आपला टाईमपास होईल. त्यामुळे मला वाटतं की, करमणूक करायला मी शाळेत असल्यापासूनच सुरुवात केली होती. मी लहानपणी टीव्हीवर कार्टून बघत नव्हतो. मी टीव्हीवर क्रिकेट बघायचो. मी सहावी सातवीमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. "
'व्हॅलेंटाईन-डे'च्या व्हिडीओमुळे बदललं आयुष्य
पुढे अथर्वनं सांगितलं, "2019 चा 'व्हॅलेंटाईन-डे' होता. तेव्हा मी लोकांचे स्टेटस बघितले. 13-14 वर्षांची मुलं सोशल मीडियावर सॅड स्टेटस शेअर करत होते. याच विषयाचा मी एक मजेशीर व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ मी माझ्या मित्रांना दाखवला, ते खूप हसले. बऱ्याच लोकांनी त्या व्हिडीओला कमेंट्स केल्या होत्या. हे भारी आहे, आपण हे करायला पाहिजे, असा विचार मी तेव्हा केला. मग मी वेगवेगळे व्हिडीओ शेअर करायला सुरुवात केली. मला वाटतं तुम्हाला जे वाटतं तेच करा."
राज ठाकरे यांचा आवडता रिल स्टार
राज ठाकरे यांनी मनसेच्या रिलबाज पुरस्कार सोहळ्यात रिल स्टार अथर्व सुदामेचं कौतुक केलं होतं. कार्यक्रमात भाषण सुरु असताना अथर्व सुदामेला पाहताच राज ठाकरे म्हणाले, 'अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता आहे. तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहात असतो बरं का' त्यानंतर राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेला स्टेजवर बोलवलं आणि त्याचं कौतुक केलं.
View this post on Instagram
अथर्व हा इन्स्टाग्रामवर, युट्यूब या प्लॅटफॉर्मवर विविध रिल्स शेअर करतो. त्याला इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: