एक्स्प्लोर
विराटला 'फिलौरी'चा निर्माता म्हणणं माझा अपमान, अनुष्काचा संताप
मुंबई : क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नात्यावर वेगवेगळ्या स्तरातून अत्यंत उथळ चर्चा आणि पोकळ विनोद केले जातात, हे सर्वश्रुत आहे. यावरुन विराट आणि अनुष्काने वारंवार आपलं मत व्यक्त करुन टीकाकारांना झापलं आहे. अनुष्काच्या आगामी 'फिलौरी' चित्रपटासाठी विराटने पैसे ओतल्याच्या चर्चा रंगल्यानंतर अनुष्काने पुन्हा संताप व्यक्त केला आहे.
अनुष्का शर्माचं होम प्रॉडक्शन असलेल्या 'फिलौरी' चित्रपटासाठी विराट कोहलीने पैसे ओतल्याच्या चर्चांना ऊत आला होता. त्यामुळे अनुष्काने सोशल मीडियावर एक खुलं पत्र लिहून खुज्या मानसिकतेवर बोट ठेवलं आहे. 'फिलौरी हा फॉक्स स्टार हिंदी आणि क्लीन स्लेट फिल्म्सचा चित्रपट आहे. त्यामुळे ज्या प्रसिद्धीमाध्यमांनी हा दुसऱ्या कोणाचा (विराटचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे) सिनेमा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी फॅक्ट्स तपासून पहाव्यात आणि जरा लाज बाळगावी' अशा शब्दात आगपाखड केली आहे.
'बोगस सूत्रांच्या आधारे पोकळ दाव्यांना वारा घालता. इतरांनी या चित्रपटासाठी पैसे दिल्याचं म्हणणं म्हणजे माझा आणि मी आजवर या स्थानावर पोहचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचा अवमान आहे. मी माझं करिअर अत्यंत प्रतिष्ठेने करत आले आहे आणि कायमच अशा फालतू गोष्टींवर मौन बाळगणं पसंत करते. मात्र मी गप्प बसणं ही माझी कमजोरी समजू नका' असा इशाराही तिने दिला आहे.
https://twitter.com/AnushkaSharma/status/830066931373744130
अनुष्का शर्माची निर्मिती असलेला 'NH10'हा चित्रपट प्रचंड गाजला होता. सिनेमातील तिच्या कणखर व्यक्तिरेखेचंही प्रचंड कौतुक झालं होतं. त्यानंतर फिलौरी या चित्रपटात अनुष्का भूताची भूमिका साकारणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement