" प्रभू श्री रामाने ओळखले..."; चेहऱ्यावर स्कार्फ बांधून गुपचूप अयोध्येतील मंदिरात गेला 'हा' अभिनेता
Anupam Kher: राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यानंतर अनुपम खेर हे 23 जानेवारीलाही राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.
Anupam Kher At Ram Mandir: सोमवार (22 जानेवारी) रोजी अयोध्येत (Ayodhya) राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन झाले. अनेक भक्त आता प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहे. 22 जानेवारी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला अभिनेते अनुपम खेर हे देखील उपस्थित होते. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानंतर अनुपम खेर (Anupam Kher) हे 23 जानेवारीलाही गुपचूप राम मंदिरात पोहोचले आणि त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.
अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ
अनुपम खेर यांनी सेलिब्रिटी प्रमाणे नाही तर सामान्य व्यक्तीप्रमाणे प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी स्कार्फनं चेहरा झाकून घेतला होता. अनुपम यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते राम मंदिरात दर्शनासाठी गेले दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मंदिरात गर्दी दिसत आहे. या व्हिडीओला अनुपम यांनी कॅप्शन दिले, "कृपया हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. काल मी निमंत्रित पाहुणे म्हणून राम मंदिरात गेलो होतो! पण आज सगळ्यांसोबत शांतपणे मंदिरात जावंसं वाटलं. असा भक्तीचा सागर पाहिला की, माझं मन प्रफुल्लित झाले.लोकांमध्ये प्रभू श्री रामजींच्या दर्शनाचा उत्साह आणि भक्ती दिसून येत होती.मी निघायला लागलो तेव्हा एका भक्ताने मला सांगितले, “भाऊ, तोंड झाकलं तरी काही होणार नाही! प्रभू श्री रामाने ओळखले आहे!”
नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "सर, तुम्ही आज मन जिंकले." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "सर, तुमचा हा स्वभाव हृदयाला भिडतो आणि तुमच्याबद्दलचा आदर आणखीनच वाढतो"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
'कर्मा', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'तेजाब','रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. अनुपम खेर हे लवकरच इमर्जन्सी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा इतर महत्वाच्या: