Amitabh Bachchan: ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटल्यानंतर बिग बींचे मजेशीर ट्वीट; म्हणले, 'ट्विटर भैय्या, आता तर पैसे पण भरलेत...'
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची देखील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक मजेशीर ट्वीट शेअर केलं आहे.
Amitabh Bachchan On Twitter Blue Tick: ट्विटरने (Twitter) लेगसी व्हेरिफाईड अकाऊंटवरुन ब्लू टिक (Blue Tick) काढून टाकली आहे. म्हणजे असे हॅण्डल ज्यांना ट्विटरची सशुल्क सेवा न घेता ब्लू टिक मिळाले होते, त्या अकाऊंटवरुन आता ब्लू टिक हटवण्यात आली आहे. यामध्ये अभिनेते, खेळाडू, राजकारणी यांचा समावेश आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची देखील ब्लू टिक हटवण्यात आली आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक मजेशीर ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ट्विटरवरील ब्यू टिकबाबत लिहिलं आहे.
अमिताभ बच्चन यांचे ट्वीट
'अहो ट्विटर भैय्या! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्ही पैसेही भरले आहेत... नील कमल आम्हाला परत द्या भाऊ, जेणेकरून लोकांना कळेल हे अकाऊंट अमिताभ बच्चन यांचे आहे. हात जोडले आहेत आम्ही आता.' असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.
T 4623 - ए twitter भइया ! सुन रहे हैं ? अब तो पैसा भी भर दिये हैं हम ... तो उ जो नील कमल ✔️ होत है ना, हमार नाम के आगे, उ तो वापस लगाय दें भैया , ताकि लोग जान जायें की हम ही हैं - Amitabh Bachchan .. हाथ तो जोड़ लिये रहे हम । अब का, गोड़वा 👣जोड़े पड़ी का ??
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 21, 2023
बिग बींच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
'आधी असे होते की, आप जहां खड़े होते थे, लाइन वही से शुरू होती थी. पण आता तुम्हालाही रांगेत उभे राहून वाट पहावी लागेल' अशी कमेंट अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं केली आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'क्या कहे बच्चन साहब, ऐलन मस्क का क्या किया जाए'
अमिताभ बच्चन यांचे चित्रपट
केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :