Alan Arkin Passed Away : ऑस्कर विजेते अभिनेते अॅलन अर्किन यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Alan Arkin : अभिनेते अॅलन अर्किन यांचे निधन झाले आहे.
Alan Arkin : हॉलिवूड अभिनेते अॅलन अर्किन (Alan Arkin) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अॅलन अर्किन हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.
अॅलन अर्किन यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Alan Arkin)
ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी अॅलन अर्किन यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. 'लिटिल मिस सनशाईन', 'द कमिंस्की मेथड' यांसारख्या सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेटफ्लिक्सच्या काही वेबसीरिजमध्येही त्यांनी काम केलं होतं. मायकल डग्लससोबतही ते एका वेबसीरिजमध्ये झळकले होते.
View this post on Instagram
अॅलन अर्किन यांना अकादमीपुरस्कारासह बाफ्टा पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि टोनी पुरस्कारासारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अॅलन यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली असली तरी त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अॅलन अर्किनने 'या' सिनेमाच्या माध्यमातून हॉलीवूडमध्ये पदार्पण केले?
अॅलन अर्किनने 1957 मध्ये 'कोल्पो हीट वेव्ह' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच 'लिटिल मिस सनशाइन' या सिनेमातील दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2006 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळी हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला होता. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाने चांगला गल्ला जमवला होता.
Oscar-winning actor Alan Arkin passes away
— ANI Digital (@ani_digital) July 1, 2023
Read @ANI Story | https://t.co/SYWB0bkhR3#AlanArkin #Oscars #Hollywood pic.twitter.com/6NgsEXgvyw
अॅलन अर्किन यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा
अॅलन अर्किन यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अॅलन यांचा मोठा चाहतावर्ग होता. आता त्यांच्या निधनाने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अॅलन अर्किन एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. तसेच त्यांच्या अनेक भूमिकाही गाजल्या आहेत.
संबंधित बातम्या