Pushpa 2 Vs Singham Again : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' समोर अजय देवगणचा 'सिंघम अगेन'घेणार माघार! कधी होणार रिलीज?
Pushpa 2 Vs Singham Again : रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार असल्याचे वृत्त आहे. या आधी हा चित्रपट पुष्पा-2 सोबत रिलीज होणार होता.
![Pushpa 2 Vs Singham Again : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' समोर अजय देवगणचा 'सिंघम अगेन'घेणार माघार! कधी होणार रिलीज? Ajay Devgn Singham Again to avoid clash with Allu Arjun's Pushpa The Rule on Independence Day Singham Again likely release on Diwali Pushpa 2 Vs Singham Again : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' समोर अजय देवगणचा 'सिंघम अगेन'घेणार माघार! कधी होणार रिलीज?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/879642a2ba8e7d52a8379d4d7f2f43491712923442074290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Pushpa 2 Vs Singham Again : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' (Singham Again) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. याआधीच जाहीर केल्याप्रमाणे चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीज होणार होता. मात्र, त्याच वेळी 'पुष्पा 2 : द रुल' हा चित्रपटही रिलीज होणार आहे. दोन मोठ्या चित्रपटांची रिलीज डेट एकच असल्याने बॉक्स ऑफिस कोण गाजवणार याची उत्सुकता सिनेरसिकांना होती. आता मात्र, रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाणार आहे. निर्मात्यांकडून लवकरच रिलीज डेट जाहीर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
'सिंघम अगेन'चे रात्रदिवस शूटिंग
रोहित आणि अजय देवगण यांना चित्रपट रिलीज करण्याची घाई नाही. एका सूत्राने 'बॉलीवूड हंगामा'ला दिलेल्या वृत्तानुसार, 'रोहित शेट्टी, अजय देवगण आणि टीम रात्रंदिवस या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. 15 ऑगस्ट 2024 ही रिलीज डेट लक्षात घेऊन युद्धपातळीवर चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. स्केल आणि व्हिजनमध्ये कोणतीही तडजोड होऊ नये याकडे रोहित शेट्टी आणि अजय देवगण लक्ष देत आहेत. त्यामुळेच 15 ऑगस्टची रिलीज डेट चुकली तरी चालेल. मात्र, उत्तम कलाकृती प्रेक्षकांसमोर आणली पाहिजे असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
सिंघम अगेन कधी रिलीज होणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'जिओ स्टुडिओने रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांना 'सिंघम अगेन' हा चित्रपट दिवाळी 2024 मध्ये रिलीज करण्याची सूचना केली आहे. दोघेही या तारखेचा विचार करत आहेत. दिवाळीमधील रिलीज डेट लक्षात घेऊन आता VFX आणि बॅकग्राउंड स्कोअर आता पुन्हा तयार केले जात आहेत. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. अर्जुन कपूर या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे.
दिवाळीत दुसरा कोणता बॉलिवूड चित्रपट?
दिवाळीमध्ये कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3'रिलीज होणार आहे. त्यामुळे आता 'सिंघम अगेन'ही त्याच दिवशी रिलीज झाला तर मोठ्या चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर स्पर्धा होईल. सिंघम अगेनच्या रिलीज डेटबाबत मात्र अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)