Pushpa 2 The Rule : अर्धनारी अवतार, डोळ्यांत अंगार; सहा मिनिटांच्या 'त्या' सीनसाठी 60 कोटींचा खर्च, 'पुष्पा 2' टीझरमधील पौराणिक गोष्ट काय?
Pushpa 2 Teaser Allu Arjun Gangamma Jatara : पुष्पा 2 टीझरमधील अल्लूचा हा लूक धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे. तिरुपती गंगम्मा जत्रेशी संबंधित हा उत्सव आहे. या जत्रेच्या मागे महिलांच्या मान-सन्मानाशी निगडीत एक पुराणकथा आहे.
Pushpa 2 Teaser Allu Arjun Gangamma Jatara : अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 : द रुल' (Pushpa 2) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला. जवळपास 68 सेकंदाच्या टीझरमध्ये फक्त एकच सिक्वेन्स दिसला होता. यामध्ये अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा गेटअप, लूक इतका पॉवरफूल होता की 'पुष्पा 2'चा टीझर अनेकांनी पाहिला. अल्लू अर्जुनच्या लूकवर अनेकांना प्रश्न पडले होते. टीझरमधील अल्लूचा हा लूक धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे. तिरुपती गंगम्मा जत्रेशी संबंधित हा उत्सव आहे. या जत्रेच्या मागे महिलांच्या मान-सन्मानाशी निगडीत एक पुराणकथा आहे.
गंगम्मा जत्रेची गोष्ट काय आहे?
लोककथा आणि पौराणिक कथांनुसार, श्री तैय्यागुंता गंगाम्मा ही तिरुपती शहराची ग्रामदेवी मानली जाते. अनेक कथांमध्ये ती भगवान वेंकटेश्वर स्वामींची बहीण असल्याचेही म्हटले आहे. असे म्हटले जाते की, काहीशे वर्षांपूर्वी तिरुपती आणि आसपासच्या भागात पलागोंडुलुचे राज्य होते, तेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना शिगेला पोहोचल्या होत्या.
पालेगोंडुलु महिलांवरील छळ, बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता. यावेळी अविलाला नावाच्या गावात देवी गंगामाचा जन्म झाला. तारुण्यात आल्यानंतर ती सौंदर्यवती झाली. जेव्हा पलागोंडुलुने देवी गंगामाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवीने तिच्याकडील सामर्थ्याने हल्ल्याला भयंकर उत्तर दिले.
त्यानंतर पालेगोंडुलु घाबरला आणि पळून जाऊन लपला. त्याला बाहेर काढण्यासाठी गंगम्माने 'गंगा जत्रा'ची योजना आखली. यामध्ये लोकांना आठवडाभर विचित्र वेशभूषा करून 7 दिवस गंगामाला टोमणे मारावे लागले. सातव्या दिवशी पालेगोंडुलु बाहेर आला तेव्हा गंगाम्माने त्याला मारले. या घटनेचे स्मरण करून, देवी गंगाम्माबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा सण आजही साजरा केला जातो.
या जत्रेत पुरूष महिलांची वेषभूषा करतात. त्यांच्याप्रमाणेच ते साडी नेसतात, दागिने घालतात. अशा प्रकारे ते देवी गंगाम्मा आणि स्त्रीत्वाबद्दल त्यांचा आदर व्यक्त करतात. जत्रेच्या सात दिवसात लोक वेगवेगळ्या वेशभूषा करतात, ज्यामध्ये अनेक नियम आहेत. एका वृत्तानुसार, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' च्या ट्रेलरमध्ये ज्या गेटअपमध्ये दिसत आहे तो जत्रेच्या पाचव्या दिवशी असलेला 'मातंगी वेषम' आहे.
महागडा आहे सिक्वेन्स
'पुष्पा 2' च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुनने अर्धनारीची वेशभूषा केली आहे. एका वृत्तानुसार, 'पुष्पा 2' चा हा 'गंगम्मा जत्रा' सीक्वेन्स चित्रपटाच्या कथानकात खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठीच निर्मात्यांनी एवढा मोठा खर्च केला आहे. एखाद्या हिट फिल्मच्या बजेटपेक्षा हा सीनवर अधिक खर्च करण्यात आला आहे.
हा सीक्वेन्स फक्त सहा मिनिटांचा आहे. त्याच्या चित्रीकरणासाठी 30 दिवसांचा कालावधी लागला. 'पुष्पा 2' च्या या सीक्वेन्सवर जवळपास 60 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, या सीनच्या चित्रीकरणासाठी महागडा सेट लावण्यात आला होता. जत्रेसारखी वातावरण निर्मिती व्हावी यासाठी मोठा खर्च करण्यात आला. या दृष्याच्या चित्रीकरणा दरम्यान अल्लू अर्जुनला पाठदुखीचा त्रास सतावू लागला. मात्र, त्याने चित्रीकरण पूर्ण केले. मोठ्या पडद्यावर हा सीन पाहताना प्रेक्षकांना भन्नाट अनुभव येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मोठी रक्कम खर्च केली आहे, जी अनेक बड्या फिल्म स्टार्सची फी नाही. अनेक चांगल्या हिट चित्रपटांचे बजेटही तेवढे नसते. चित्रपटातील हा सीक्वेन्स केवळ 6 मिनिटांचा आहे आणि त्याच्या शूटिंगसाठी 30 दिवस लागले आहेत. 'पुष्पा 2'च्या या एका सीक्वेन्सवर सुमारे 60 कोटी रुपये खर्च झाले आहेत.