एक्स्प्लोर

हिंदीतून भाषण करताना अडखळली, ट्रोलही झाली, पण न्यासा देवगनचं अहमदनगरच्या ग्रामीण भागात केलेलं हे समाजकार्य 'लई भारी'

Nysa Devgan Viral Video: नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असणारी न्यासा देवगन तिच्या हिंदीतून केलेल्या भाषणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Nysa Devgan: बॉलिवूड स्टार कपल अजय देवगन (Ajay Devgan)आणि काजोलची (Kajol)लाडकी लेक न्यासा देवगन (Nyasa Deevgan) अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती आतापर्यंत सर्वात जास्त चर्चेत असणारी स्टार किड्सपैकी एक आहे. कधी बदललेल्या लूकमुळे, कधी फोटोमुळे तर कधी स्टायलिश कपड्यांमुळे नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. अहमदनगरमधील एका कार्यक्रमात न्यासाने तोडक्या मोडक्या हिंदीतून भाषण केल्याने ती ट्रोल झाली. पण त्याचवेळी न्यासाने एनवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या कामाची छाप मात्र यावेळी उमटवली.  

अहमदनगरच्या ग्रामीण भागात एनवाय (NY Foundation) फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला न्यासाने हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले आहे. या कार्यक्रमात तिने खूप तोडके-मोडके हिंदी भाषण करत मुलांना शिक्षणाबद्दलचे महत्व सांगितले. तिच्या हिंदीमुळे आता ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.

Nyasa Devgan Speech: हिंदीतून भाषण करताना न्यासा अडखळली 

न्यासा आपल्या भाषणात खूपदा अडखळल्याची दिसून आली. भाषण करताना ती एकच शब्द अनेकदा बोलताना दिसते आहे. शाळकरी मुलांना हिंदीतून अभ्यासाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करुन देताना तिला शब्द सुचेनासे झाले. तिचा भाषणाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिची खिल्ली उडवली. अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यातील एकजण म्हणतो विदेशात राहून इंग्रजी शिकली परंतु भारतात राहून साधं हिंदी बोलता येत नाही.

अजय देवगनच्या सोशल-वर्क विंग एनवाय फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याची मुलगी न्यासाने हजरी लावली. यावेळी न्यासा पारंपारिक ड्रेसमध्ये दिसली. तिने पिवळा सलवार सूट घातला होता. कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ती उत्साहित आणि आनंदी दिसते आहे. न्यासा पारंपारिक महाराष्ट्रीयन पोशाखातील महिला आणि पुरुषांसोबत फोटो देतानाही दिसत आहे.

NY Foundation: एनवाय फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य

न्यासाने डिजिटल लायब्ररी उघडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच तिने शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकं आणि खेळण्यांच्या किटचे वाटप केले. न्यासाने 200 हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांचा अभ्यास आणि क्रीडा उपक्रमांकडे असलेला कल पाहून न्यासा भारावून गेली.

अजय देवगणने सामाजिक काम करण्यासाठी एनवाय फाउंडेशनची स्थापना केली असून त्या अंतर्गत देशभरात विविध सामाजिक कामं केली जातात.  या उपक्रमांमध्ये वंचितांना जेवण देणे, साथीच्या आजारादरम्यान लसीकरण शिबिरे, वैद्यकीय मदतीसाठी पैसे देणे, पंजाबमधील विधवांना शिक्षण आणि उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देणे यांचा समावेश आहे. एनवाय फाउंडेशनने रूरल रिलेशनच्या प्रदीप लोखंडे यांच्याशी करार केला आहे. 
 
ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शनUddhav Thackeray Dadar Full Speech : राज ठाकरेंवर निशाणा, मोदींना सुनावलं, उद्धव ठाकरेंचं भाषणMumbai North East Lok Sabha : मराठी आणि गुजराती मतदार नेमके कोणाच्या बाजूने?Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात गेल्या सात वर्षांत एकही दंगल झाली नाही : योगी आदित्यनाथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Uddhav Thackeray On Raj Thackeray : ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
ठाकरे नावाचा भाडोत्री घेतलाय, आत्ताच उठले असतील, सुपारी चघळत बसले असतील; उद्धव ठाकरेंचा राज यांच्यावर हल्लाबोल
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
शेतातल्या घरातच चालवायचा बनावट देशी दारुचा कारखाना; पोलिसांचा छापा, आरोपीचा निघला काटा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होता येणार, औसेकर महाराजांची माहिती
Nancy Tyagi Indian Fashion Influencer Cannes 2024 : भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
भारतीय रील स्टारची 'कान्स'मध्ये हवा; स्वत: तयार केलेल्या ड्रेसने दिली दिग्गजांना टक्कर
Raju Shetti : कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी यासाठी आदेश द्या; राजू शेट्टींची मागणी
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
भाजपला आता आरएसएस नकोय, ज्या शिडीने वर आले तीच सोडायला तयार; प्रकाश आंबेडकरांचा टोला
Actor Chandrakanth Death :  धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
धक्कादायक! पत्नीचे कार अपघातात निधन, सहा दिवसांतच अभिनेता पतीने उचलले टोकाचे पाऊल; मनोरंजनसृष्टी हळहळली
Embed widget