Sara Ali Khan च्या गाण्यावर थिरकली हवाई सुंदरी, व्हायरल झाला VIDEO
Viral Video: विमानातच एका हवाई सुंदरीने सारा अली खानच्या गाण्यावर डान्स केला आहे. या डान्सचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
Viral Video: सध्या इंटरनेटवर दररोज काही न काही गोष्ट व्हायरल होत असते. त्यात इन्स्टाग्राम रील्सच्या युगात बॉलीवुडच्या गाण्यांवर डान्सही भन्नाट व्हायरल होत असतो. त्यातच एका हवाई सुंदरीचा (Air Hostess) बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) गाण्यावरील डान्स व्हायरल झाला आहे. याआधी आयत या एअर हॉस्टेसचा 'मनिके मगे हिते' या गाण्यावरील डान्स चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एका एअर होस्टेसचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ही हवाई सुंदरी स्पाइसजेट या कंपनीसाठी काम करत असून संबधित कंपनीच्या विमानातच हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या गाण्यात 'अतरंगी रे' या साराच्या आगामी चित्रपटातील चका चक गाण्यावर डान्स व्हायरल होत आहे. या एअर हॉस्टेसचं नाव उमा मीनाक्षी असं असून तिचा हा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस
हा डान्स व्हिडीओ उमाने स्वत: तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन (Instagram Account) शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो व्यूज आणि लाइक्स मिळत आहेत. उमाने या व्हिडीओला कॅप्शन दिलं असून तिने लिहिलं आहे,'हाय चका चक हू मे. उड़ान के बाद भी चका चक हूं में.' असं चका चक गाण्याच्या ओळींवरुन कॅप्शन दिलं आहे.
हे ही वाचा
- Sara Ali Khan : लग्न कोणाशी करणार? सारा म्हणाली..
- Sara Ali Khan : सिक्यूरिटी गार्डच्या कृत्यामुळं सारा अली खानला मनस्ताप; तात्काळ मागितली माफी; व्हिडीओ व्हायरल
- Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha