(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aditya Narayan : आदित्य नारायणने लाडक्या लेकीची पहिली झलक केली शेअर, पाहा फोटो
Aditya Narayan Daughter : आदित्य नारायणने 'त्विषा'चा गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
Aditya Narayan Daughter : आदित्य नारायणने (Aditya Narayan) लाडक्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'त्विषा' असे आदित्य नारायणच्या मुलीचे नाव आहे. 'त्विषा' तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. आदित्य त्याच्या लाडक्या लेकीचे लाड पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो.
'त्विषा'चे इंस्टाग्रामवर 2000 हून अधिक फॉलोअर्स
'त्विषा' तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्य आणि श्वेताने तिचे इंस्टाग्राम अकाऊंट बनवले आहे. छोट्या 'त्विषा'चे इंस्टाग्रामवर 2000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. आदित्यचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून 'त्विषा'ची झलक पाहायची प्रतीक्षा करत होते. आता आदित्यने 'त्विषा'चा फोटो चाहत्यांसोबत शेअर केल्याने चाहते आनंदी झाले आहेत.
आदित्य नारायणने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चाहत्यांसाठी एक प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले होते. या सत्रात चाहत्यांनी त्याला सारेगमप शो सोडण्यापासून त्याच्या कुटुंबापर्यंत अनेक प्रश्न विचारले होते. दरम्यान आदित्यला एका चाहत्याने त्याच्या मुलीचे फोटो शेअर करण्याबाबत प्रश्न विचारला होता. यावेळी उत्तर देताना आदित्य म्हणाला होता, त्विषाचे फोटो शेअर करण्यासाठी तिच्या आईची परवानगी घ्यावी लागेल. तसेच आदित्यने लिहिले की,"वडीलधारी मंडळी जसं सांगतात त्याप्रमाणे 40 दिवसांनंतरच बाळाचा फोटो दाखवला पाहिजे".
View this post on Instagram
लेकीचा सांगीतिक प्रवास सुरू!
आदित्यने सांगितले की, त्याच्या मुलीचा संगीत प्रवास आतापासून सुरू झाला आहे. मी आतापासून तिच्यासाठी गाणी म्हणायला सुरुवात केली आहे. संगीत तिच्या डीएनएमध्येचं आहे. माझ्या बहिणीनेही तिला एक छोटा म्युझिक प्लेअर भेट दिला आहे. ज्यामध्ये नर्सरीमध्ये राईम्स आणि अध्यात्मिक संगीताचा आनंद घेता येतो. अगदी जन्मतःच तिचा हा सांगीतिक प्रवास सुरु झाला आहे.
आदित्यच्या लहान मुलीचा जन्म 24 फेब्रुवारी 2022 रोजी झाला. आदित्यने 4 मार्च रोजी चाहत्यांबरोबर त्याची गोड बातमी शेअर केली. सिंगरने सोशल मीडियावर लिहिले की, श्वेता आणि मी देवाचे आभारी आहोत की त्याने 24.02.2022 रोजी आम्हाला एक सुंदर मुलगी आशिर्वादच्या रूपात दिली.
संबंधित बातम्या