Rakhi Sawant: लग्नाच्या चर्चेवर अखेर आदिलनं सोडलं मौन; म्हणाला, 'हो, मी राखीसोबत लग्न केलंय, पण सध्या...'
राखी (Rakhi Sawant) आणि आदिल दुर्रानी यांनी लग्नगाठ बांधली, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता आदिलनं राखीसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.
Rakhi Sawant: बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या वक्तव्यांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. राखीनं मराठी 'बिग बॉस'मध्ये देखील सहभाग घेतला होता. राखीनं काही दिवसांपूर्वी आदिल दुर्रानीसोबतचे (Adil Durrani) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोमध्ये राखी आणि आदिल यांच्या गळ्यात फुलांच्या माळा दिसत आहेत. तसेच ते दोघे सही एक कागदावर सही करताना दिसत आहेत. राखीनं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. राखी आणि आदिल दुर्रानी यांनी लग्नगाठ बांधली, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. आता आदिलनं राखीसोबतच्या लग्नाच्या चर्चेवर मौन सोडलं आहे.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीनमध्ये आदिलनं सांगितलं, 'हो, राखी आणि माझं लग्न झालं आहे. आम्ही एकत्र राहत आहोत आणि आनंदी आहोत. पण सध्या कुटुंबाला समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांना आमच्या नात्याबद्दल माहिती आहे, पण त्यांना अजूनही आम्ही समजवण्याचा प्रयत्न करत आहोत.' राखी ही आदिलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
View this post on Instagram
आदिल खान हा बेंगळुरुमध्ये राहत होता. त्याचा कारचा व्यवसाय आहे. राखीचे आदिलसोबतचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बिग बॉस या शोमुळे राखीला लोकप्रियता मिळाली. राखी तिच्या विनोदी वक्यव्यामुळे चर्चेत असते.
राखीनं शेअर केला व्हिडीओ
नुकताच राखीनं आदिलसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदिल आणि राखी यांचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. व्हिडीओमध्ये राखी ही ऑफ शोल्डर, थाई हाई स्लिट पिंक ड्रेसमध्ये दिसत आहे तर आदिल हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. राखीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: