एक्स्प्लोर
शूटिंगदरम्यान सेटवर अपघात, शाहरुख खान थोडक्यात बचावला
मुंबई : चित्रीकरणादरम्यान सेटवर झालेल्या अपघातात अभिनेता शाहरुख खान थोडक्यात बचावला. आनंद एल राय यांच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुरु असताना सेटवर अपघात झाला. यामध्ये दोन क्रू मेंबर जखमी झाले आहेत.
शाहरुख खान सेटवर असताना सीलिंगचा मोठा भाग खाली कोसळला. यामध्ये दोन जण जखमी झाले. त्यांना तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर शाहरुख खानला फार मोठी दुखापत झालेली नाही.
मुंबईतील फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचा सेट उभारण्यात आला होता. अपघातानंतर सिनेमाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे.
आनंद एल राय यांच्या सिनेमात शाहरुख खानसह कतरिना कैफ आणि अनुष्का शर्माही दिसणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement