एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पे'ट्रोल'! इंधन दरवाढीवरील पोस्टमुळे प्रशांत दामले ट्रोल
विविध देशांतील पेट्रोलच्या दरांविषयी माहिती टाकणारी पोस्ट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर ट्रोल झाले.
मुंबई : इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच सलग चौदाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागतच आहेत. विविध देशांतील पेट्रोलच्या दरांविषयी माहिती टाकणारी पोस्ट केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सोशल मीडियावर ट्रोल झाले.
प्रशांत दामले यांनी शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजून 23 मिनिटांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. 'आज हाँगकाँगमध्ये पेट्रोलची किंमत आहे 144 रुपये प्रतिलीटर, चीनमध्ये तीच 81 रुपये आहे, तर सिंगापूरमध्ये 110 रुपये इतकी आहे.' असं दामलेंनी लिहिलं होतं.
प्रशांत दामले नरेंद्र मोदी समर्थक असून पेट्रोल दरवाढीचं समर्थन करत आहेत, असा समज करुन सोशल मीडिया यूझर्सनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
कोणी सिंगापूर, चीन अशा देशांमधील जीवनमान भारताच्या तुलनेत कसं उच्च आहे, तिथलं चलन आणि त्या देशांच्या नागरिकांना महाग पेट्रोलचे दर कसे सहज परवडतात, हे सांगितलं; तर कुणी त्यांच्या कपाळावर मोदीभक्त असल्याचा शिक्का मारला.
कोणी समजवलं, कोणी त्यांची कीव केली, कोणी खिल्ली उडवली, तरी कोणी जहाल शब्दात गरळही ओकली.
प्रशांत दामलेंनी रविवारी दुपारी पुन्हा एक पोस्ट टाकली. 'एक सामान्य माणूस म्हणून मला काही सत्य गोष्टी कळतील अशी अपेक्षा होती, पण झालं भलतंच... काही अभ्यासपूर्ण कमेंट वगळता वैयक्तिक टीका आणि उपहासात्मक उत्तरं ऐकायला मिळाली' अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मी नमोभक्तही नाही आणि काँग्रेस भक्तही नाही. गेली 35 वर्ष माझा 80% प्रवास हा रस्तेमार्गेच होतो. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलच्या संदर्भात सत्य जाणून घेऊया असं मनात होतं. आता मी माझ्या पद्धतीने माहिती मिळवीन, असं दामलेंनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement