Salman Khan And Aayush Sharma : 'लोक समजतात माझ्याकडे जे काही आहे ते सलमानचंच'; आयुषने व्यक्त केली खंत
Salman Khan And Aayush Sharma: आयुष आणि सलमानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ (Antim: The Final Truth) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
Salman Khan And Aayush Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. सलमानची बहिण अर्पिताचा पती आयुष शर्मा (Aayush Sharma) देखील अभिनेता आहे. आयुष आणि सलमानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ (Antim: The Final Truth) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आयुषने सलमान आणि त्याच्या नात्याबद्दल लोक कसा विचार करतात याबद्दल सांगितले आहे.
मुलाखतीमध्ये आयुषने सांगितले, 'माझं एवढं दुर्भाग्य आहे की, मी काही जरी नवी गोष्ट खरेदी केली तरी लोकांना वाटते की मी ती सलमानकडून घेतली आहे. माझ्याकडे काही नाहीये आणि जे काही आहे ते मला सलमानने दिले आहे असे लोक समजतात. पण मला टीका करणारे लोक आवडतात. मला ट्रोल करणाऱ्या लोकांना चुकीचं ठरवण्यात आनंद वाटतो. '
View this post on Instagram
आयुष शर्मा आणि सलमानची बहिण अर्पिताने 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. अर्पिताला सलमानचे वडील सलिम खान यांनी दत्तक घेतले होते. आयुष आणि अर्पिताला अहिल आणि आयत ही दोन मुलं आहेत. 'अंतिम : द फायनल ट्रुथ' या चित्रपटामध्ये आयुषने एका गुंडाची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.