एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'दंगल'चा नवा विक्रम, देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'दंगल' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम रचला आहे. आमीरच्याच 'पीके' सिनेमाला मागे टाकत 'दंगल' हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
भारतीय चित्रपटांच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरण्याचा मान 'दंगल'ला मिळाला आहे. आतापर्यंत हा विक्रम आमीरच्या पीके चित्रपटाच्या नावावर होता. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पीके'ची एकूण कमाई 340.8 कोटी रुपये इतकी आहे. मात्र दंगल सिनेमानं 345.3 कोटी रुपयांचा गल्ला जमवत अवघ्या 17 दिवसात हा विक्रम मोडित काढला आहे.
दंगलने तिसऱ्या वीकेंडला 31.79 रुपयांची कमाई केली आहे. दंगल 23 डिसेंबर 2016 रोजी भारतात 4 हजार 300, तर देशाबाहेर एक हजार स्क्रीन्सवर झळकला होता. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या काळातही सिनेमाने इतकी घसघशीत कमाई केली आहे. परदेशातील आकडेवारी पाहता 500 कोटींचा गल्ला पार झाला आहे.
https://twitter.com/taran_adarsh/status/818373576906579968
https://twitter.com/taran_adarsh/status/818362013474664448
आमीरची बॉक्स ऑफिसवर 'दंगल', सलमानच्या 'बजरंगी भाईजान'चा विक्रम मोडला!
सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दंगल पहिला, पीके दुसरा आहे. तिसऱ्या क्रमांकावर सलमानचा बजरंगी भाईजान (2015)- 320.34 कोटी, तर चौथ्या क्रमांकावर सुलतान (2016) 300.45 कोटी आहे. पाचव्या स्थानावर आमीरचा धूम 3 (2013) 284.7 कोटी आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/817978910851764225 डिसेंबरमध्ये प्रदर्शित आमीरच्या सिनेमांचा गल्ला दंगल (2016)- 345.3* कोटी पीके (2014)- 340.8 कोटी धूम 3 (2013)- 284.7 कोटी 3 इडियट्स (2009)- 202.95 कोटी गजनी (2008)- 114 कोटीबॉक्स ऑफिसवर 'दंगल' सुरुच, गल्ला...
'गजनी' हा शंभर कोटींच्या पार जाणारा पहिला चित्रपट होता. '3 इडियट्स' हा 200 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला चित्रपट होता, तर 'पीके' हा 300 कोटींहून अधिक गल्ला जमवणारा पहिला सिनेमा ठरला. https://twitter.com/taran_adarsh/status/818324582931148800 सिनेमात आमीर खान कुस्तीपटू महावीर फोगाट यांच्या भूमिकेत आहे. गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांच्या संघर्षावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ‘दंगल’ची भारतातील आतापर्यंतची कमाई :- शुक्रवारी (पहिला दिवस) – 29.78 कोटी
- शनिवार (दुसरा दिवस) – 34.82 कोटी
- रविवार (तिसरा दिवस) – 42.41 कोटी
- सोमवार (चौथा दिवस) – 25.69 कोटी
- मंगळवार (पाचवा दिवस) – 23.09 कोटी
- बुधवार (सहावा दिवस)- 21.46 कोटी
- गुरुवार (सातवा दिवस)- 20.29 कोटी
- शुक्रवार (आठवा दिवस)- 18.59 कोटी
- शनिवार (नववा दिवस)- 23.07 कोटी
- रविवार (दहावा दिवस)- 32.04 कोटी
- सोमवार (अकरावा दिवस)- 13.45 कोटी
- मंगळवार (बारावा दिवस)- 10.46 कोटी
- बुधवार (तेरावा दिवस)- 9.23 कोटी
- गुुरुवार (चौदावा दिवस)- 9.12 कोटी
- शुक्रवार (पंधरावा दिवस)- 6.66 कोटी
- शनिवार (सोळावा दिवस)- 10.80 कोटी
- रविवार (सतरावा दिवस)- 14.33 कोटी
- सतरा दिवसात एकूण – 345.30 कोटी रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement