एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रील लाईफ वडील जायराच्या पाठीशी, पत्रकाद्वारे आमीरचं समर्थन
मुंबई : सुपरहिट 'दंगल' सिनेमात छोट्या गीता फोगाटची भूमिका साकारणाऱ्या जायरा वासीमच्या समर्थनार्थ, रील लाईफ वडील अर्थात अभिनेता आमीर खान समोर आला आहे. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत, असं पत्रक काढून आमीरने जायराला दिलासा दिला आहे.
जायरा वासीमने नुकतीच जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. यानंतर जायराने या भेटीबाबत फेसबुकवर जाहीर माफीही मागितली.
यावर आमीर खानने लिहिलं आहे की, मी जायराची पोस्ट वाचली. तिला अशी पोस्ट लिहावी लागली, हे मी समजू शकतो. जायरा, आम्ही तुझ्या पाठिशी आहोत. तुझ्यासारखी हुशार, तरुण, प्रतिभावान, मेहनती, आदर, काळजी करणारी आणि धाडसी मुलगी फक्त देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी रोल मॉडेल आहे. माझ्यासाठी तर तू नक्कीच रोल मॉडेल आहेस. लव्ह. आमीर
एवढंच नाही तर आमीरने सगळ्यांना तिच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं आहे. आमीर लिहितो की, माझं सगळ्यांना आवाहन आहे की, आता तिला एकटं सोडा, ती फक्त 16 वर्षांची लहान मुलगी आहे, हे सत्य स्वीकारा आणि त्याचा आदर ठेवा. ती तिच्या आयुष्याला उत्तमरित्या सामोरं जात आहे.
'दंगल' फेम जायरा वसीम वादात, सोशल मीडियावरुन माफीनामा
काय आहे प्रकरण? जायराने मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतली. या भेटीत जायरा वसीम ही काश्मीरी तरुणांसाठी रोल मॉडेल असल्याचं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या. ज्यांच्यामुळे काश्मीर अस्थिर बनलंय, त्या मुफ्तींशी जायराने भेट घेतल्याची टीका काश्मीर खोऱ्यातील कट्टरपंथींनी जायरावर केली. नेटिझन्सनी सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं. यानंतर जायराने फेसबुकवर जाहीर माफी मागितली. विशेष म्हणजे, तिने आपल्या माफीनाम्यामध्ये काश्मीरी जनतेने तिला रोल मॉडेल समजू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. कारण इतिहासात अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे मला त्यांच्या पंगतीत नेऊन बसवणे त्यांचा अपमान ठरेल. तसेच आपल्याला नवा कोणताही वाद उपस्थित करायचे नसल्याचे तिने यावेळी सांगितलं. तसंच ती जे काही करत आहे, त्यावर तिला अभिमान नसल्याचंही जायराने सांगितलं. पण हा माफीनामा तिने तीनच तासात हटवला.जायरा वासिमची फेसबुक पोस्ट
"मी नुकतीच ज्यांना भेटले, त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते. मी 16 वर्षांची आहे, हे समजून माझ्यासोबत तसाच व्यवहार करावा. मी जे काही केलं, त्याबाबत मी सर्वांची माफी मागते. कारण माझ्याकडून अनावधानाने चूक घडली. मला सर्वजण माफ करतील अशी अपेक्षा व्यक्त करते. काश्मीरी जनतेने तिला रोल मॉडेल समजू नये, अशी अपेक्षाही मी व्यक्त करते. कारण इतिहासात अनेक रोल मॉडेल आहेत, त्यामुळे मला त्यांच्या पंगतीत नेऊन बसवणे हा त्यांचा अपमान ठरेल. मला कोणताही वाद उपस्थित करायचा नाही. मी जे काही करत आहे, त्यावर मला अभिमान नाही."अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement