Sanjeev Kumar Death Anniversary : संजीव कुमार यांच्याआधी 'या' अभिनेत्याला करायची होती 'ठाकूर'ची भूमिका; नाव ऐकून थक्क व्हाल
Sanjeev Kumar Death Anniversary : 'खिलौना' चित्रपटात आपले अप्रतिम अभिनय कौशल्य दाखविणारे संजीव कुमार यांनी आजच्याच दिवशी 1985 मध्ये या जगाचा निरोप घेतला.
Sanjeev Kumar Death Anniversary : आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे बॉलिवूड अभिनेते संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांची आज पुण्यतिथी. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अभिनेते संजीव कुमार यांनी आजवर अनेक चांगल्या भूमिका निभावल्या आहेत. त्यांनी निभावलेली प्रत्येक भूमिका चाहत्यांच्या मनावर अजूनही राज्य करत आहे. पण, त्यातही त्यांची शोले (Sholay) चित्रपटातील ठाकूरची भूमिका आजही लक्षात आहे. असे असले तरी, संजीव कुमार यांच्या आधी ठाकूरची भूमिका आधी वेगळ्याच अभिनेत्याला करायची होती.
'हा' अभिनेता करणार होता ठाकूरची भूमिका
'शोले'मध्ये संजीव कुमारच्या आधी हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते धर्मेंद्र यांना 'ठाकूर'ची भूमिका साकारायची होती. धमेंद्र यांच्या या निर्णयानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनाही प्रश्न पडला. मात्र, जेव्हा रमेश सिप्पी यांनी धर्मेंद्र यांना सांगितले की, 'जर तो 'ठाकूर'ची भूमिका साकारणार असेल तर संजीव कुमार हे वीरूची भूमिका साकारतील. अशा परिस्थितीत तुम्ही हेमाजींबरोबर जास्त वेळ घालवू शकणार नाही. रमेश सिप्पी यांचा हा फॉर्म्युला चांगलाच कामी आला. यानंतर धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका साकारण्यास होकार दिला. आणि संजीव कुमार यांनी 'ठाकूर'ची भूमिका साकारली.
'शोले'मध्ये संजीव कुमारने 'ठाकूर'ची भूमिका आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अजरामर केली. आजही संजीव कुमार यांच्या चाहत्यांच्या ओठी त्यांची ओळख 'ठाकूर' या नावानेच केली जाते. आज जरी संजीव कुमार आपल्यात नसले तरी मात्र, त्यांच्या अजरामर चित्रपटांची आठवण आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
संजीव कपूर यांच्याविषयी...
दिवंगत अभिनेते संजीव कुमार यांचा जन्म 09 जुलै 1938 रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. बालपणापासूनच चित्रपटांमध्ये काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी राजश्री प्रॉडक्शन निर्मित ‘आरती’ चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली, मात्र निवड झाली नाही. त्यांनी काम मिळावं म्हणून खूप संघर्ष केला. अखेर त्यांना 1965 मध्ये आलेल्या ‘निशान’ चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. यानंतर त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही.
महत्वाच्या बातम्या :
Alia Bhatt Delivery : आलिया भट्ट लवकरच देणार गोड बातमी; प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल