एक्स्प्लोर

ड्रग्ज प्रकरणात आज मोठा दिवस, NCB करणार दीपिका, श्रद्धा, साराची चौकशी

Bollywood drug case : ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चौकशी करणार आहे.

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि सिमोन खंबाटा यांच्यासह सात जणांना समन्स बजावले आहे. आज, 26 सप्टेंबर रोजी दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चौकशी करणार आहे. ड्रग्सबाबत चर्चा करणारी काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट एजन्सी रडारवर आहे. दीपिक पादुकोणची व्यवस्थापक करिश्मा प्रकाश आणि “डी” यांच्यात हे व्हॉट्सअॅप चॅट झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या अंमली पदार्थांच्या कनेक्शननंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींची नावं यात समोर आली आहेत.

NCB ने समन्स बजावल्यामुळे सारा अली खान आज त्यांच्यासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहे. आज सकाळी दहा वाजता ती आपल्या जुहू येथील बंगल्यातून NCB कार्यालयाकडे रवाना होणार आहे. तिच्या जुहू येथील बंगल्यासमोर आज पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. जुहू येथील बंगल्यातून रवाना झाल्यानंतर ती काही वेळातच NCB च्या कार्यालयात पोहोचेल आणि अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देईल.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?

क्वान कंपनीची टॅलेंट मॅनेजर जया शाह हिची आणि ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी यांच्या चौकशीत श्रद्धा कपूर, सारा अली खान, रकुल प्रीत यांची नावं समोर आली होती. याबाबत मंगळवारी एनसीबीने जया शाहची चौकशी केली होती. त्यामध्ये जयाने माहिती दिली होती की तिने श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्यासाठी सीबीडी ऑईलची ऑनलाईन ऑर्डर केली होती. यामध्ये तिने हे देखील नमूद केलं आहे की यासाठी तिने कोणत्या पेडलरशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर जयाला पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलवण्यात येणार होतं, परंतु मुंबईतील मुसळधार पावसामुळे ते शक्य झालं नव्हतं. जया शहाच्या माहितीच्या आधारे बुधवारी श्रद्धा कपूरला समन्स पाठवण्यात आला होता. त्यानुसार आज श्रद्धा सकाळी 11 पर्यंत एनसीबीच्या ऑफिसला जाण्याची शक्यता आहे.

आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा

दीपिकाला काय प्रश्न विचारले जाणार?

1) करिश्मा प्रकाशची चॅट केलं होतं का?

2) तुम्ही ड्रग्ज घेता का?

3) करिश्माकडून ड्रग्ज मागवले होते?

4) कोको बारमध्ये कोणकोण गेलं होतं?

5) कोको बारमध्ये ड्रग्जचं सेवन केलं का?

6) तुम्ही ड्रग्ज अॅडिक्ट आहात का?

7) एखाद्या ड्रग्ज सप्लायरला ओळखता?

8) कधी एखाद्या पेडलरकडून ड्रग्ज मागवलं?

9) ड्रग्ज वगळता इतर कोणता नशा करता?

10) इंडस्ट्रीमधले ड्रग अॅडिक्ट कोण आहेत?

11) तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप त्या एडमिन आहेत का? ज्यात ड्रग्स विषयी चॅट झाले?

सुशांत स्वत:च्या नशेची सवय पूर्ण करण्यासाठी सर्वांचा वापर करायचा, तसा त्यानं आमचाही केला : रिया चक्रवर्ती

सारा अली खान

1) सुशांतशी मैत्री कधी झाली?

2) सुशांतच्या फार्म हाऊस वर कधी पार्टी केली होती.

3) सुशांतशी किती वर्षांपासून ओळख होती? श्रद्धा कपूरला ओळखते का?

4) रिया आणि सुशांत सोबत कधी कुठल्या ड्रग्जच्या पार्टीमध्ये सामील झाली होती का?

5) सुशांत सोबत बँकॉक टूर मध्ये काय झालं होतं आणि कोण कोण त्याच्यासोबत होतं?

6) सुशांत सोबत केदारनाथच्या सेट वर ड्रग्ज घेतले होते का ?

7) रियाने सांगितलं की साराकडून सुशांत आणि रियाने पहिल्यांदा ड्रग्ज मागवले होते. त्यामुळे ती कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का?

8) बॉलिवूडमध्ये कोण कोण ड्रग्ज घेतं काही माहिती आहे का?

9) पावना डॅम येथील बोट चालकचा स्टेटमेंट साराला ऐकवलं जाणार आणि त्यावर तिला विचारण्यात येणार

10) कुठलं अजून व्यसन आहे का?

11) सारा कुठल्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होती का? जर होती तर ती संपर्कात कशी आली

12) सुशांत ड्रग्ज घेत होता का? आणि कोण त्याला ड्रग्ज देत होतं?

13) बॉलिवूडमध्ये ज्या पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये कधी सारा गेली होती का? तिथे कधी ड्रग्ज घेतले होते का?

14) ड्रग्ज चॅट संदर्भात आणि रियाच्या जबाबा वर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.

15) जया सहा आणि श्रुती मोदीला ओळखते का? कधीपासून ते सुशांतला ड्रग्ज पुरवत होते का?

16) सुशांतच्या स्टाफने जबाब दिला आहे की सारा सुशांतच्या पार्टीमध्ये असायची. त्यावर सुद्धा साराला विचारण्यात येणार आहे.

श्रद्धा कपूर

1) जया सहाला ओळखते का?

2) ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात आहे का? आणि कशी आली?

3) सुशांतच्या घरी किंवा फार्महाऊसवर पार्टी केली आहे का?

4) पावना डॅम येथील आयलेंड वर कधी ड्रग्ज पार्टीला गेली होती?

5) कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का?

6) फिल्म छिछोरेच्या वेळी कधी ड्रग्जचं सेवन केल आहे का

7) सुशांतशी मैत्री कधी झाली?

8) जगदीशने जबाब दिला आहे की श्रद्धा सुद्धा ड्रग्जपार्टीमध्ये असायची त्या जबाबाच्या आधारित प्रश्न विचारण्यात येणार. काय झालं होतं? कोण कोण होतं पार्टीमध्ये?

9) सुशांत ड्रग्ज घेत होत का? कोण आणून देत होतं?

10) बॉलीवूड मधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात प्रश्न असतील?

महत्त्वाच्या बातम्या

AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित कपिल सिब्बलांकडून पुन्हा निवडणूक आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Embed widget