Rashmika Vijay Reception Viral Video: रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात हाणामारी; गपचूप घुसणाऱ्या व्यक्तीला बाउन्सर्सनी उचललं अन्... VIDEO
Rashmika Vijay Reception Viral Video: एका अज्ञात व्यक्तीनं रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर उभ्या असलेल्या बाउन्सर्सनी त्याला लगेचच पकडलं आणि बाहेर काढलं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाउन्सर्स त्या माणसाला गेटमधून पकडून बाहेर काढत असल्याचं दिसतंय आहे.

Rashmika Vijay Reception Viral Video: सिनेसृष्टीतील पॉवर कपल्सपैकी एक असलेले रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रश्मिका आणि विजयच्या (Rashmika Vijay Reception) लग्नाचा साधेपणा, पारंपरिक सोहळा सर्वांनाच आवडला. सेलिब्रिटींचं लग्न म्हणून मोठा थाटमाट असेल, असं सर्वांनाच वाटलेलं, पण अगदी सुंदर आणि साध्या पद्धतीनं रश्मिका-विजयनं आपली लग्नगाठ बांधली. सर्वांनी विजय-रश्मिकावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये आपली लग्नगाठ बांधल्यानंतर 4 मार्च रोजी VIROSH नं हैदराबादमध्ये एका रिसेप्शनचं आयोजन केलं होतं, ज्यामध्ये दक्षिण भारतातील प्रमुख सेलिब्रिटी उपस्थित होते. रिसेप्शनच्या ठिकाणी चाहत्यांनी गर्दी केली होती, ते जोडप्याची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीनं रश्मिका-विजयच्या रिसेप्शन सोहळ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण बाहेर उभ्या असलेल्या बाउन्सर्सनी त्याला लगेचच पकडलं आणि बाहेर काढलं. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये बाउन्सर्स त्या माणसाला गेटमधून पकडून बाहेर काढत असल्याचं दिसतंय आहे.
View this post on Instagram
गपचूप रश्मिका- विजयच्या रिसेप्शनमध्ये घुसणं पडलं भारी
व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, एक अज्ञात व्यक्ती गर्दीचा फायदा घेत रिसेप्शनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे, पण तेवढ्यात बाउन्सरच्या लक्षात येतं आणि ते त्याला पकडतात. त्यानंतर तिथे थोडीशी धक्काबुक्की होते. त्यानंतर बाउन्सर्स त्याला धक्का देऊन बाहेर काढतात. ती व्यक्ती बाउन्सर्सना काहीतरी समजावण्याचाही प्रयत्न करतात, पण ते त्याचं काहीच ऐकून घेत नाहीत आणि त्याला धक्का मारुन बाहेर हाकलवून लावतात. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, या व्यक्तीनं खूप चांगले कपडे घातले आहेत. कदाचित त्यानं असं केलं असेल जेणेकरून त्याचे आकर्षक कपडे संशयास्पद वाटू नयेत आणि तो आत जाऊ शकेल. पण तसं झालं नाही. आता, या माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'VIROSH'च्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी
रश्मिका आणि विजयच्या रिसेप्शनला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती, तर हिंदी सिनेसृष्टीतील काही स्टार्स दिसले. महेश बाबू, राणा दग्गुबाती, नागार्जुन, अल्लू अर्जुन, दग्गुबती व्यंकटेश, राम चरण, नानी, रवी तेजा, चिरंजीवी, श्री लीला, क्रिती सॅनॉन, नीना गुप्ता, रिया चक्रवर्ती आणि करण जोहर रिसेप्शनला उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















