Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
अखेर सर्व शंका कुशंकांना विराम देत राज्यातली राज्यसभा निवडणूक बिनविरोध झालीये... महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आणि महायुतीच्या सहा जणांनी आपले अर्ज भरले... निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी त्यात अनेक इंटरेस्टिंग गोष्टी घडल्यात... बघुयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
८५ वर्षांचे शरद पवार आणि अवघ्या ३५ वर्षांचे पार्थ पवार या आजोबा-नातवाची जोडी राज्यसभेत दिसेल...
पार्थ यांच्या निमित्तानं पवार घराण्यातील आणखी एक व्यक्ती संसदीय राजकारण सक्रीय होण्यास सिद्ध झालीये...
अन् शरद पवारांचं नाव, अनुभव आणि ऑरा यामुळे महाविकास आघाडीत सर्वात कमी आमदार असलेल्या राष्ट्रवादीला संधी मिळालीये...
महाविकास आघाडीतून शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं खरं...
मात्र ही जागा आपल्या पक्षालाच मिळाली पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या अदित्य ठाकरेंची कोंडी झाली...
बहुदा त्यामुळेच पवारांच्या अर्ज भरण्यासाठी आघाडीचे अनेक बडे नेते हजर असताना आदित्य काही तिकडे फिरकले नाहीत...
पवारांचा अर्ज भरायला जाण्याऐवजी अर्जून तेंडुलकरच्या लग्नात वऱ्हाडी म्हणून जाणं त्यांनी अधिक पसंत केलं...
त्यामुळे पवारांना पाठिंबा दिला असला, तरी हा निर्णय नाईलाजानं घेतल्याचा संदेश ठाकरेंनी दिलाय का?
All Shows































