Gold rate and Silver price: अमेरिका-इराण युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात प्रचंड चढउतार, चांदीचा भाव 40 हजारांनी कोसळला, सोन्याच्या भावातही घसरण
Gold rate and Silver rate latest: गेल्या काही दिवसांमध्ये जागतिक पातळीवर अस्थिरता निर्माण झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात प्रचंड चढउतार पाहायला मिळत आहेत.

Gold rate and Silver rate latest: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे सध्या पश्चिम आखाती देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. याचे पडसाद जागतिक पातळीवर उमटताना दिसत आहेत. आखाती देशांमधून जगातील अनेक देशांना खनिज तेलाचा (Crude Oil) पुरवठा होतो. मात्र, सध्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल (America vs Israel War) यांच्यातील युद्धामुळे खनिज तेलाच्या पुरवठ्यात काहीसा खंड पडला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर अन्य घटकांवर याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे गेल्या चार दिवसांत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Silver Rate) मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, गेल्या काही तासांत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात (Gold price) मोठी वाढ होऊन सोन्याचा भाव प्रतितोळा 1 लाख 70 हजारांच्या पातळीवर जाऊन पोहोचला होता. तर चांदीचा प्रतिकिलो दर 2 लाख 95 हजारांवर जाऊन पोहोचला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत चांदी आणि सोन्याच्या दरात पुन्हा घसरण पाहायला मिळाली.
सोन्याच्या दरात तब्बल 8 हजार रुपयांची मोठी घसरण होऊन सोने 1,62,000 तर चांदीच्या दरात 40 हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचा भाव 2 लाख 60 हजारांच्या आसपास स्थिरावल्याचे पाहायला मिळत आहे. शेअर बाजार कोसळला असताना सोने चांदीचे दर हे नेहमीच वाढत असल्याचे पाहायला मिळते. यावेळी मात्र भांडवली बाजारासह सोने, चांदीचे दरही घसरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Gold Rate Investment : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता
अमेरिका- इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर दिसून आला आहे. पुण्यातील KRA ज्वेलर्सचे भागीदार अतुल अष्टेकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना सोन्याच्या दरांवर भाष्य केलं.27 -28 तारखेपर्यंत सोन्याचे दर 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत होते. शनिवारी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंत सोन्याचे दर 1 लाख 69 हजारांवर पोहोचले होते. जागतिक पातळीवर अस्थिरता असल्यानं सोन्याचे दर कमी जास्त होत आहे. हे युद्ध किती दिवस चालतं यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. युद्ध आठ दहा दिवसात संपलं तर परिस्थिती नॉर्मल होईल. बरेच तज्ज्ञ म्हणतात युद्ध तीन चार आठवडे लांबलं तर परिणाम तेलावर होईल. तेलाचा पुरवठा कमी झाला तर भविष्यात त्याचा महागाईवर परिणाम होतो. जेव्हा महागाईवर परिणाम होतो, त्यावेळी सोन्याचे भाव वाढलेले दिसतात. महागाई वाढली तर सोन्याचे दर वाढतील. युद्ध पुढील आठ दहा दिवसात थांबलं तर सोन्याच्या दरात एक, दोन, तीन टक्के, पाच टक्के युद्धाचे दर पाहत होतो तेवढे म्हणजेच 1 लाख 60 हजार रुपये होऊ शकतो. तर, युद्ध लांबलं तर सांगता येणार नाही पण सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज अतुल अष्टेकर यांनी व्यक्त केला होता.
आणखी वाचा
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
महत्त्वाच्या बातम्या





















