आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा
बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उघड करता-करता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा (NCB) तपास टीव्ही कलाकारांपर्यंत पोहोचला आहे. टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर(Abigail Pandey Sanam Johar) यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा Drugs Case TV Actors Connection Case Registered Against Abigail Pandey Sanam Johar आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/09/25164805/Abigail-Pandey-Sanam-Johar-.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: बॉलिवूड कलाकारांनंतर आता टीव्ही कलाकारांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा फास आवळत चालला आहे. बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन उघड करता-करता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास टीव्ही कलाकारांपर्यंत पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमीवर टीव्ही स्टार अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्याविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेले दोन दिवस सतत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांची चौकशी केली जात होती. 23 सप्टेंबरला पहिल्यांदा दोघांना एनसीबीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्या दिवशी दोघांकडून दिलेल्या माहितीच्या आधारे 24 सप्टेंबरला एनसीबीकडून मुंबईमध्ये तीन ठिकाणी रेड टाकण्यात आल्या. सुरुवातीला जेव्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची एनसीबीकडून झडती घेण्यात आली, त्यावेळेस त्यांना तिथे गांजा सापडला. अबिगेल पांडे आणि सनम जोहर या दोघांकडून टीव्ही इंडस्ट्रीमधील अजून काही मोठी नाव ड्रग्स प्रकरणात समोर आली.
आज पुन्हा अबिगेल पांडे आणि सनम जोहर यांच्या घराची झडती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून घेण्यात आली. तसेच या दोघांवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून ड्रग्सच सेवन केल्याप्रकरणी NDPSअॅक्ट 20 अंतर्गत गुन्हा देखील नोंदवण्यात आला. मात्र दोघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
रिया चक्रवर्तीच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काही ड्रग्स पेडलरला अटक केली होती आणि त्यांच्याकडूनच अबिगेल पांडे आणि सनम जोहर ही नावं समोर आली होती. ज्या नंतर एनसीबीच्या तपासाची दिशा टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. अबिगेल पांडे आणि सनम जोहर टीव्ही मालिका नच बलियेमध्ये सुद्धा एकत्र होते. दोघे रिअल लाईफ कपल आहेत. टीव्हीमध्ये विविध मालिकांमध्ये दोघांनी काम केलं आहे.
रियाने चौकशीदरम्यान कुणाचीही नावे घेतली नाहीत, वकील सतीश मानशिंदे यांचा दावा
हे रियल लाईफ कपल कधीपासून ड्रग्स घेत होते? कुठल्या ड्रग्स पेडलरशी हे दोघे संपर्कात होते का? त्यांना ड्रग्स कोण पोहोचवत होतं? त्यांच्या सोबत अजून कोण-कोण ड्रग्स घेत होतं? या सर्व प्रश्नांची माहिती आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला या जोडीकडून हवी असणार आहे.
या ड्रग्ज प्रकरणात टीव्ही इंडस्ट्रीमधील पहिल्यांदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून येणाऱ्या दिवसांमध्ये अजून मोठ्या नावांचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)