(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख अन् करण जोहर NCB च्या रडारवर?
बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकणाचा तपास नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुरु केल्यापासून अनेक मोठी नावे समोर येत आहेत. आता तर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि निर्माता करण जोहर NCB च्या रडारवर आले आहेत.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास आता करण जोहरची कंपनी धर्मा प्रोडक्शनपर्यंत पोहोचला आहे. धर्मा प्रोडक्शनचे एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसर क्षितीज प्रसाद आणि धर्मा प्रोडक्शनचे असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, क्षितीजच्या चौकशीमुळे शाहरुख खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नेमकं शाहरुख खान का एनसीबीच्या तपासाच्या घेऱ्यात येऊ शकतो त्यावर हा स्पेशल रिपोर्ट.
करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये क्षितीज प्रसाद हे फक्त एक्झिक्यूटिव्ह प्रोडूसरच नाही तर एक मोठं नाव आहे. क्षितिज प्रसाद यांनी धर्मा प्रोडक्शनच्या आधी बालाजी टेलिफिल्मस, शाहरूख खानची रेड चिलीज आणि जॉन अब्राहम प्रोडक्शन हाऊससाठीही काम करत होता. त्यामुळे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. क्षितीज प्रकाशला जेव्हा एनसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या घरातून गांजाही सापडला होता.
क्षितीज प्रकाश धर्मा प्रोडक्शनचं मोठं नाव आहे आणि इतर मोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये सुद्धा त्याने काम केल आहे. ज्यामुळे एक मोठा मासा एनसीबीच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं जातं आहे. नेमकी क्षितीज प्रसादची चौकशी का महत्त्वाची आहे?
आता टीव्ही कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन समोर, NCB कडून अबिगेल पांडे, सनम जोहरविरोधात गुन्हा
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शर्लिन चोप्राने काही गंभीर आरोप ही लावले होते. शर्लिनचा दावा आहे की ‘आयपीएलची टीम कोलकाता नाइट रायडर्सच्या पार्टीत क्रिकेटर्सच्या पत्नी ड्रग्स घेत होत्या तर बॉलिवूडचा किंग खान सुद्धा ड्रग्सचं सेवन करतात’ हा खळबळजनक दावा शर्लिन चोप्राने केला. क्षितिज प्रसाद हा आधी शाहरुख खानच्या मालकीच्या असलेल्या रेड चिलीजमध्ये सुद्धा होता. त्यामुळे क्षितीजकडून फक्त धर्मा प्रोडक्शनचं नाही तर रेड चिलीज बद्दल सुद्धा माहिती एनसीबीकडून घेण्यात येणार आहे.
क्षितीज प्रकाशसोबत धर्मा प्रोडक्शनचा असिस्टंट डायरेक्टर अनुभव चोपडाची सुद्धा चौकशी आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून करण्यात आली. तसच करण जोहरच्या घरी ड्रग्स पार्टी झाली असा आरोप करत अनेक लोकांकडून करण जोहर आणि त्या पार्टीला उपस्थित सेलिब्रिटीजची चौकशी अशी मागणी होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात करण जोहरपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न एनसीबी करणार हे निश्चित.
बॉलिवूडमध्ये ड्रग्स घेतले जातात हे तर उघड सत्य होतं. पण यात नेमकी कोण लोकं सामील आहेत ते कधीच कळू शकलं नाही. अधून मधून काही नावं चर्चेत यायची. मात्र, त्यांना तिथेच पूर्णविराम लागायचा. मात्र, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास सुरू केल्यापासून ही नावं उजेडात येण्यास सुरुवात झालेली आहे.
Drugs Case | ड्रग्जबाबतच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात रकुलची कबुली, ड्रग्ज न घेतल्याचा दावा- सूत्र