सलमान खानच्या वडिलांशी भाजपच्या आशिष शेलारांचा संवाद; म्हणाले, सलीम खान यांचं ठरलंय
BJP leader Ashish Shelar Meets Salim Khan: वांद्रेमध्ये प्रचारादरम्यान आशिष शेलार यांची सलीम खान यांच्याशी भेट. भेटीदरम्यानचा दोघांचा फोटो व्हायरल.

BJP leader Ashish Shelar Meets Salim Khan: सर्वत्र महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सर्वांचेच लक्ष सर्वात श्रीमंत महानगरपालिका अर्थात मुंबई महानगरपालिकेकडे आहे. केवळ महायुती नसून महाविकास आघाडी तसेच इतर पक्षाचे मुंबई महानगरपालिकेकडे लक्ष आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात स्थानिक पातळीवरील युतींनाही वेग आला आहे. स्टार प्रचारकही मैदानात उतरले असल्याचं पाहायला मिळत आहे.
महायुतीतील नेते मंडळींची गोविंदा असो किंवा सलमान खान यांच्यासोबत खास नाते आहे. हे नेते मंडळी बॉलिवूडच्या कलाकारांशी भेट घेत असतात. 2024 साली गोळीबाराच्या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तर, गणेशोत्सवानिमित्त सलमान खानने एकनाथ शिंदेंच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. अप्रत्यक्षपणे स्टार कलाकारांचे महायुतीतील नेत्यांसोबत आलेले संबंध आपण पाहिलेच असतील. या भेटींचीही सर्वत्र चर्चा होते.
आशिष शेलारांनी घेतली सलीम खान यांची भेट
Met veteran screenwriter, actor and director Salim Khan during the campaign at Bandstand and appealed for his support in favour of the Mahayuti candidate.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 10, 2026
प्रचारादरम्यान आज वांद्रे बँड स्टँड येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची भेट झाली. यावेळी त्यांना… pic.twitter.com/kxLQvH9J7a
परंतु, अलिकडेच सलमान खानचे वडील सलीम खान आणि भाजप नेत्याच्या भेटीची प्रचंड चर्चा होत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली. मंत्री आशिष शेलार हे वांद्रे बँड स्टँड पक्षाच्या प्रचारासाठी गेले होते. प्रचारादरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी सलीम खान यांची भेट घेतली. तसेच महायुतीतील उमेदवाराला मत देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं. दोघांमधला 'तो' फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
आशिष शेलारांकडून पोस्ट शेअर
दरम्यान, आशिष शेलारांनी समाजमाध्यमांमध्ये पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. आशिष शेलार यांनी पोस्ट शेअर करून फोटोला कॅप्शन देखील दिलं आहे. "प्रचारादरम्यान आज वांद्रे बँड स्टँड येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांची भेट झाली. यावेळी महायुतीच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन करण्यात आले".
सध्या आशिष शेलार यांची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तसेच राजकी वर्तुळातही चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, खान परिवारातून महायुतीला पाठिंबा दर्शवणारे कोणतेही अद्याप आवाहन करण्यात आलेले नाही.
बॅटल ऑफ गलवान चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लवकरच बॅटल ऑफ गलवान या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो अभिनेत्री चित्रांगदासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट 17 एप्रिल 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
























