"अमलला ट्रॉफीच द्या! मृदुलच्या एविक्शननं फॅन्स भडकले, बिग बॉसचं बायकॉट सुरू; फरहानाची भविष्यवाणी खरी ठरली"
तिच्या या भविष्यवाणीचं आता कौतुक होत आहे, तर दुसरीकडे मृदुलचे चाहते चांगलेच तावातावाने प्रतिक्रिया देत आहेत.

Bigg Boss 19: सलमान खानच्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) मध्ये मिड-वीक धक्का बसला आहे. युट्यूबर मृदुल तिवारी घराबाहेर झाल्याची बातमी समोर आली आणि सोशल मीडियावर अक्षरशः खळबळ उडाली. अभिषेक बजाजच्या एलिमिनेशनचा धक्का अजून चाहत्यांच्या मनातून गेला नाही तोवर मृदुलच्या आउट होण्याच्या बातमीने चाहते चांगलेच भडकलेत. जरी ही माहिती अजून अधिकृतरीत्या जाहीर केलेली नाही, तरी रिपोर्ट्सनुसार एका टास्कदरम्यान लाइव्ह ऑडियन्सच्या वोटिंगमध्ये मृदुलला सर्वात कमी मतं मिळाली आणि त्याला घराबाहेर दाखवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, फरहाना भट्टचा जुने व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस 19’च्या मागील एपिसोडमध्ये ती अमल मलिकसोबत बेडरूममध्ये बोलत होती. त्या वेळी ती म्हणाली होती, “लक्षात ठेव अमल, यावेळी मृदुल Nomination पडला तर परत येणार नाही.” तिच्या या भविष्यवाणीचं आता कौतुक होत आहे, तर दुसरीकडे मृदुलचे चाहते चांगलेच तावातावाने प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर संतापाची लाट
ज्या क्षणी मृदुल घराबाहेर झाल्याची बातमी आली, त्याच क्षणी सोशल मीडियावर #BoycottBiggBoss हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.एका युजरने लिहिलं, “जर मृदुल नाही, तर बिग बॉसलाही नाही.” दुसऱ्या युजरने संताप व्यक्त करत म्हटलं ,“बायकॉट बिग बॉस, अनफेयर एलिमिनेशन, बायस्ड शो. सलमानचा गोद घेतलेला मुलगा अमल, त्यालाच ट्रॉफी देऊन टाका.” एकाने तर थेट लिहिलं, “हा रिअॅलिटी शो नाही, हा लोकांना मूर्ख बनवण्याचा शो आहे.”
i have to say that farhana's game knowledge is top notch 🔥
— 𝑨𝒏𝒂𝒚𝒂 ❥ (@OG_Anaya_) November 10, 2025
[ #FarrhanaBhatt #Bahana #Biggboss19 ] pic.twitter.com/L2Q5JOjgIv
🚨 Mridul Tiwari is EVICTED from the #BiggBoss19 house in mid-week eviction twist through Live Audiences (Via Filmwindow)
— BBTak (@BiggBoss_Tak) November 10, 2025
मृदुल तिवारी जिंकण्याच्या रेसमध्ये का होता?
मृदुल तिवारी शोमध्ये वोटिंगद्वारे एंट्री घेतलेला स्पर्धक होता. त्याने शहबाजला हरवून बिग बॉसच्या घरात पाऊल टाकलं होतं. पण सलमान खानने त्याला अनेक वेळा वीकेंड का वारमध्ये सुनवलं होतं , “गेम दाखव, मुद्द्यांवर बोला, थोडं खुलून खेळ.” सलमानच्या म्हणण्यानुसार, चाहत्यांची संख्या जरी मोठी असली, तरी स्क्रीनवर दमदार गेम नसेल तर आठवणीत राहणार नाही, आणि मतदारही साथ देणार नाहीत.
“मेकर्सना भीती होती मृदुल जिंकेल!”
बऱ्याच युजर्सचा दावा आहे की मृदुलच्या लोकप्रियतेमुळे मेकर्सना भीती वाटत होती की तो शो जिंकू शकतो. म्हणूनच गेल्या काही आठवड्यांपासून सलग “अनफेयर” एविक्शन्स होत आहेत. असे सोशल मीडियावर आरोप होत आहेत.अभिषेक बजाज आणि बसीरचे एविक्शनही चाहत्यांच्या मते अन्यायकारक ठरवले जात आहेत. त्यामुळे शो ‘स्क्रिप्टेड’ असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.























