Dolyavar Gogal Lava : ‘डोळ्यावर गॉगल लावा’; ‘भिरकीट’चित्रपटामधील ठसकेदार लावणी प्रेक्षकांच्या भेटीला
17 जून रोजी ‘भिरकीट’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
Dolyavar Gogal Lava : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘भिरकीट’ (Bhirkit) नावाच वादळ घोंगावत आहे. ‘भिरकीट’ च्या ट्रेलरला व गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यातून प्रेक्षकांमध्ये चांगलाच हश्या पिकणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांचा ठसकेदार आवाज मिळाला असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 17 जून रोजी ‘भिरकीट’ नावाचे वादळ संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणतात, ‘भिरकीट’ चित्रपटात प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात विनोद आणि कौटुंबिक संबंधाबरोबरच ठसकेदार लावणी ही पहायला मिळणार आहे. नक्कीच हे गाणं प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.
क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत व अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘भिरकीट’ चित्रपटाची निर्मीती सुरेश जामतराज ओसवाल व भाग्यवंती ओसवाल यांनी केली असून पटकथा व संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण मीर व संकलन फैजल महाडिक यांनी केले आहे.शैल व प्रितेश या जोडीचे धमाल संगीत लाभलेल्या या चित्रपटाच्या वितरणाची धुरा युएफओने सांभाळली आहे.
संबंधित बातम्या
- पंजाबमधील आप सरकारने काल सुरक्षा काढून घेतली, आज काँग्रेस नेते आणि गायक सिद्धू मुसेवालांची गोळ्या घालून हत्या
- सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट तिहार जेलमध्येच रचला, दिल्ली पोलिसांच्या हाती लागली महत्वपूर्ण माहिती
- Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी
- Funral : सन्मानाने जगण्यासोबत मरणाचाही आनंदोत्सव करण्याचा कानमंत्र देणाऱ्या 'फनरल'चा ट्रेलर रिलीज