एक्स्प्लोर

Apurva Nemlekar : अण्णांच्या शेवंताची नवी भूमिका; 'रावरंभा' सिनेमात अपूर्वा नेमळेकर झळकणार 'शाहीनआपा'च्या भूमिकेत

Apurva Nemlekar : अपूर्वा नेमळेकर 'रावरंभा' या सिनेमात शाहीनआपाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Apurva Nemlekar : 'रावरंभा' (Raavrambha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावावाने कायम चर्चेत असणारी अण्णांची शेवंता 'रावरंभा' या सिनेमात शाहीनआपाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

अपूर्वाने शाहीनआपाचा लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आतापर्यंत माझ्या वेगवेगळ्या भूमिकांवर तुम्ही अतोनात प्रेम केलं आहे. अशीच एक वेगळी भूमिका आता मी साकारली आहे. शाहीनआपा येतेय येत्या 12 मे ला प्रदर्शित होणाऱ्या 'रावरंभा' या सिनेमाच्या माध्यमातून". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Apurva Nemlekar (@apurvanemlekarofficial)

शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे. आरस्पानी सौंदर्य आणि धारदार नजर यांचा सुरेख मिलाप असणारी करारी बाण्याची 'शाहीन आपा'  ही भूमिका अपूर्वा लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'रावरंभा' या सिनेमात साकारणार आहे.

शाहीनआपाच्या भूमिकेबद्दल अपूर्वा नेमळेकर म्हणाली...

शाहीनआपाबद्दल बोलताना अपूर्वा म्हणाली,"शिवछत्रपतींच्या कार्याला छुपी मदत करणारी 'शाहीन आपा' ही अतिशय महत्त्वपूर्ण   ऐतिहासिक सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचा योग जुळून आला असून या भूमिकेसाठी मी तितकीच उत्सुक होते. माझी ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मला स्वत:लाही काही वेगळं केल्याचं समाधान या भूमिकेने दिलं आहे".

'रावरंभा' कधी होणार प्रदर्शित? (Raavrambha Release Date)

'रावरंभा' हा सिनेमा येत्या 12 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहे. या सिनेमातील गाणी गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने लिहली आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्यासोबत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडणारी मोनालिसा बागल (Monalisa Bagal) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने 'रावरंभा' या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले असून हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता 'रावरंभा' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

संबंधित बातम्या

Raavrambha : इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अनोखी प्रेमकथा घेऊन येतोय ओम भूतकर; 'रावरंभा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Birari On Home Minister: 'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
'होम मिनिस्टर'मध्ये पूजा - सोहम बांदेकरची एन्ट्री? नक्की खरं काय? पूजा म्हणाली, 'उखाणे घेत असताना अनेकांचे डोळे...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
Embed widget