एक्स्प्लोर
लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण
बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांच्यासह मुलगा अभिषेक बच्चन याने देखील आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं ट्विटर वर सांगितलं. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रमोशनल आणि प्रोफेशनल प्रोजेक्टवर वर्क फ्रोम होम केलं आहे.
![लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण Amitabh bachchan admitted for covid 19 Big b shutting in lockdown period work from home लॉकडाऊन काळात बिग बी अमिताभ यांचं घरुन शूट, KBC सह काही जाहिरातींचं चित्रिकरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/12134837/bachchan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं देशव्यापी लॉकडाऊन असल्यानं बॉलिवूडमधले सगळे स्टार मंडळी घरातच आहेत. या काळात जे काम मिळालं ते देखील घरातूनच केलं गेलं. लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक प्रमोशनल आणि प्रोफेशनल प्रोजेक्टवर वर्क फ्रोम होम केलं. मात्र असं असतानाही अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
मार्च मध्ये त्यांनी सार्वजनिक सेवेसंदर्भातील एका घोषणेचा व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. हा व्हिडीओ अमिताभ बच्चन यांच्या घरातच शूट केला होता. जो हिंदी आणि इंग्रजी भाषेत शूट झाला होता.
एप्रिलमध्ये अमिताभ बच्चन हे एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसले. 'फॅमिली' नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये त्यांच्या भूमिकेचं सगळं शूटिंग हे त्यांच्या घरीच करण्यात आलं. या शॉर्ट फिल्ममध्ये कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं महत्व सांगितलं होतं. यात अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट्ट, दिलजीत दोसांझ आणि रणबीर कपूरसह अन्य काही अॅक्टर्स दिसून आले होते.
Abhishek Bachchan | अमिताभ बच्चन यांच्यानंतर मुलगा अभिषेक बच्चन याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह
मे महिन्यात अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती 12' साठी काही प्रोमोज आपल्या घरीच शूट केले. या शूटसाठी 'दंगल' आणि 'छिछोरे' चे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रिमोटच्या साहाय्याने दिग्दर्शन केलं होते. फिल्म इंडस्ट्रीतील सूत्रांच्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन एका प्रोमोशनल/अॅड फिल्मच्या डबिंगसाठी आपल्या ऑफिसच्या स्टुडिओत गेले होते.
Bachchan family | अमिताभ, अभिषेक यांच्या व्यतिरिक्त बच्चन कुटुंबातील सदस्यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
अमिताभ आणि अभिषेक यांना सौम्य लक्षणं
एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. अमिताभ यांना सुरुवातीला सौम्य लक्षणं दिसताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली. त्यांच्या आणखी चाचण्या करण्यात येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. अमिताभ आणि अभिषेक दोन्ही बापलेकांना मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)