Super Bowl: दुसऱ्यांदा आई होणार पॉप सिंगर रिहाना; परफॉर्मन्स दरम्यान फ्लॉन्ट केला होता बेबी बंप
सुपर बाऊल इव्हेंटमध्ये (Super Bowl Halftime Show) परफॉर्मन्स करताना रिहानानं (Rihanna) बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.

Rihanna Second Pregnancy: प्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका रिहानानं (Rihanna) तिच्या चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. रिहाना आणि तिचा पती रॅपर असॅप रॉकी (A$AP Rocky) यांच्या घरी लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सुपर बाऊल इव्हेंटमध्ये (Super Bowl Halftime Show) परफॉर्मन्स करताना रिहानानं बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. तेव्हा पासूनच रिहानाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. पण पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, आता रिहानाच्या रिप्रेजेंटेटिवनं रिहानाच्या प्रेग्नन्सीची माहिती दिली आहे.
2022 मध्ये दिला मुलाला जन्म
रिहानानं 2022 मे महिन्यामध्ये मुलाला जन्म दिला. आता रिहाना दुसऱ्यांदा आई होणार आहे. पहिल्या प्रेग्नन्सी दरम्यान रिहानानं रिव्हिलींग फोटोशूट देखील केलं होतं. या फोटोशूटमध्ये तिनं बेबी बंप फ्लॉन्ट केलं होतं. रिहानाच्या वेअर हॅव यू बीनस डायमंड्स, वी फाऊंड लव्ह, अम्ब्रेला आणि रन थिस टाऊन या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
SHE’S BAAAACK 👑 @Rihanna #AppleMusicHalftime pic.twitter.com/rH2G9r2RSc
— NFL (@NFL) February 13, 2023
रिहानाचं कमबॅक
सुपर बाऊल हा इव्हेंट अमेरिकेमधील सर्वात मोठ्या फुटबॉल इव्हेंटपैकी एक आहे. या इव्हेंटमध्ये प्रसिद्ध गायक परफॉर्म करतात. सुपर बाऊल इव्हेंटमधून रिहानानं कमबॅक केलं. कारण 2018 नंतर रिहानानं कोणताही लाईव्ह परफॉर्मन्स केला नव्हता. तिच्या या इव्हेंटमधील धमाकेदार एन्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रूड बॉय, डायमंड्स या गाण्यांवर रिहाना यांनी परफॉर्म केलं. रिहानाचा गेल्या सात वर्षात एकही अल्बम रिलीज झाला नाही. रिहानाच्या आगामी अल्बम्सची तिचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. रिहानाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. तिच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
चर्चेत असते रिहाना
रिहाना ही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. अनेक वेळा ती वैयक्तिक कारणांमुळे देखील चर्चेत असते. भारतात 2021 मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत रिहानानं वक्तव्य केलं होतं. आंदोलनातील फोटो शेअर करुन तिनं लिहिलं होतं, 'आपण याबद्दल का बोलत नाही?' तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले होते. एका फोटोशूटमुळे रिहाना वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. रिहानाने तिचा एक टॉपलेस फोटो शेअर केला. तिने हिंदू देवता गणपतीचे पेंडेंट असलेले नेकलेस परिधान केल्याने नवा वाद निर्माण झाला होता.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Rihanna : रिहानाच्या टॉपलेस बॉडीवर गणपतीचे पेंडंट, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
