Rihanna : रिहानाच्या टॉपलेस बॉडीवर गणपतीचे पेंडंट, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने (Rihanna ) नुकतेच एक फोटो शूट केलं असून त्यामध्ये तिने आपल्या टॉपलेस बॉडीवर गणपतीचे पेंडंट परिधान केल्याचं दिसतंय. त्यावरुन आता नवा वाद निर्माण झालाय.

वॉशिंग्टन: अमेरिकन पॉप सिंगर रिहाना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने नुकतंच एक फोटो शूट केलं असून त्यावरुन रिहानाला टिकेचा सामना करायला लागतोय. रिहानाने आपला एक टॉपलेस फोटो शेअर केला असून त्यावर तिने हिंदू देवता गणपतीचे पेंडेंट असलेले नेकलेस परिधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. रिहानाने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
रिहानाने आपल्या सोशल मीडियावरुन हे टॉपलेस फोटो शेअर केले असून त्यामध्ये तिने आपल्या गळ्यात गणपतीचे पेंडेंट असलेला नेकलेस परिधान केला आहे. यावरुन रिहानावर अनेक स्तरातून टीका होत आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपही तिच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रिहाना मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे.
when @PopcaanMusic said “me nuh wan ya wear no lingerie tonight fa me girl” @SavageXFenty pic.twitter.com/bnrtCZT7FB
— Rihanna (@rihanna) February 15, 2021
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केल्यानंतर रिहाना भारतात चर्चेत आली होती. सोशल मीडियावर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधात असे दोन गट तयार झाले होते. रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, अली फजय यांच्यासोबत काही सेलिब्रेटिंनी तिला पाठिंबा दिला होता तर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार आणि इतर अनेक सेलिब्रेटिंनी तिला विरोध करत हा भारतातील अंतर्गत मुद्दा असल्याचं सुनावलं होतं.
Rihanna: भारतात गुगलवर सर्च केली जाणारी रिहाना कोण आहे?
आताही रिहाना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने आपल्या टॉपलेस बॉडीवर हिंदू देवता गणपतीच पेंडंट असलेले नेकलेस परिधान केल्याचं दिसून येतंय. हिंदू धर्मावर श्रद्धा असलेल्या जगभरातील लोकांनी रिहानाच्या या पोस्टवर टीका केली आहे. रिहानाने आपल्या या फोटोच्या माध्यमातून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप तिच्यावर करण्यात येत आहे.
रिहानाने प्रसिद्धी मिळवण्यासाठी हिंदूंच्या भावना दुखावल्या असून तिने हा फोटो तात्काळ हटवावा अशी अनेकांनी मागणी केली आहे. गणपतीशी जगभरातील कोट्यवधी लोकांच्या भावना जोडल्या असून रिहानाने केवळ प्रसिध्दी मिळावी म्हणून हे कृत्य केल्याची टीका तिच्यावर करण्यात येत आहे. दिल्ली आंदोलनावर ट्वीट केल्यानंतर रिहानाच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली होती.























