Modern Love Mumbai Twitter Review : सहा दिग्दर्शक अन् सहा वेगवेगळ्या कथा, पाहा प्रेक्षकांना कशी वाटली ‘मॉडर्न लव्ह मुंबई’...
Modern Love Mumbai : Amazon Prime Video ने आपली 'मॉडर्न लव्ह मुंबई' ही नवी सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या सीरीजमध्ये सहा लोकांच्या वेगवेगळ्या सहा कथांचा समावेश केला आहे.
Modern Love Mumbai : सध्या ओटीटीवर अनेक नवे चित्रपट आणि सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. थिएटरमध्ये रिलीज झालेले काही चित्रपटदेखील आता पुन्हा एकदा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. अशातच Amazon Prime Video ने आपली 'मॉडर्न लव्ह मुंबई' (Modern Love Mumbai) ही नवी सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या सीरीजमध्ये सहा लोकांच्या वेगवेगळ्या सहा कथांचा समावेश केला आहे. या सीरीजमध्ये शोनाली बोस (रात राणी), हंसल मेहता (बाई), विशाल भारद्वाज (मुंबई ड्रॅगन), अलंकृता श्रीवास्तव (माय ब्युटीफुल रिंकल्स), ध्रुव सेहगल (आय लव्ह ठाणे), आणि नुपूर अस्थाना (कटिंग टी) हे सहा प्रसिद्ध दिग्दर्शक त्यांच्या सहा कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
या सीरीजमध्ये आधुनिक काळातील जीवन, आजच्या काळातील प्रेमाच्या अनोख्या छटा दाखवण्यात आल्या आहेत. या सीरीजमधील प्रत्येक एपिसोड 40 मिनिटांचा आहे. मुंबईतील मध्यमवर्गीय जीवन ते अगदी उच्चभ्रू राहणीमान या सगळ्यांमधील प्रेमाची नेमकी व्याख्या काय, हे या सीरीजमध्ये बघायला मिळते. छोट्या छोट्या असणाऱ्या या कथा मात्र प्रेमाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवतात.
सीरीजचं संगीतही श्रवणीय!
केवळ कथाच नाहीत, तर या सीरीजचं म्युझिकदेखील प्रेक्षकांना आवडलं आहे. ‘मॉडर्न लव्ह मुंबई’चे शीर्षक गीत ‘मौसम है प्यार के’ हे गाणे गायक निखिल डिसूझाने गायले आहे. संगीतकार राम संपत यांनी या सीरीजला संगीत दिले आहे. यामध्ये मीयांग चांग, विशाल भारद्वाज, सोनू निगम आणि निकिता गांधी यांच्यासह इतर अनेक गायकांनी गाणी गायली असून, त्यांच्या आवाजाने ही सीरीज आणखी खुलली आहे.
नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलीये सीरीज!
‘मॉडर्न लव्ह मुंबई’च्या या सहा कथा अनेक प्रेक्षकांना पसंत पडल्या आहेत. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘केवळ रोमान्सच नाही, तर स्वतःविषयी प्रेम, मैत्री, स्वप्न आणि कुटुंब या सगळ्या विषयांभोवती या सीरीज फिरत आहेत. यातील आशय खूप सुंदर आहे’, असे एका युझरने म्हटले आहे. तर, आणखी एकाने लिहिले की, ‘आजच्या पिढीतील नातेसंबंध अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहेत.’
हेही वाचा :
Chhavi Mittal Post : कॅन्सरच्या ऑपरेशननंतर पहिल्यांदाच छवी जिममध्ये, फोटो शेअर करत म्हणाली...
Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!