स्वप्नांची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायानगरीत अर्थात मुंबईत संपूर्ण बॉलिवूड विश्व स्थिरावलं आहे. अगदी देशातील कोणत्याही भागांतून लोक कलाकार, स्टार बनण्यासाठी मुंबईत येतात. अनेक वर्षांचा संघर्ष करून एखादं काम मिळवतात आणि पहिल्याच प्रोजेक्टमधून रातोरात स्टार बनतात. जाणून घेऊया अशाच काही बॉलिवूड कलाकारांबद्दल...
2/6
शाहरुख खान : अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबई नगरीत आलेल्या शाहरुखने अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र, त्याच्या पहिल्या चित्रपटाने अर्थात ‘दिवाना’ने त्याला यशाची एक व्गलीच उंची दाखवली. या चित्रपटासाठी फिल्मफेअर देखील मिळाला होता.
3/6
दीपिका पदुकोण : शाहरुख खानसोबतचा ‘ओम शांती ओम’ हा दीपिकाचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातून दीपिकाने भरपूर प्रसिद्धी मिळवली.
4/6
आमिर खान : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खान याचा जुही चावलासोबतचा ‘कयामत से कयामत तक’ हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले होते.
5/6
आयुष्मान खुराना : पंजाबी मनोरंजन विश्वात सक्रिय असणाऱ्या अभिनेता आयुष्मान खुरानाने ‘विक्की डोनर’मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.
6/6
अनुष्का शर्मा : शाहरुखच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनुष्का शर्माने या चित्रपटातून चांगलीच वाहवा मिळवली होती.