Alia Ranbir Wedding : नववधूच्या वेशात दुसऱ्यांदा आलियाची पाठवणी करणार सोनी राझदान! पहिल्या ‘विदाई’बद्दल माहितेय का?
Alia Ranbir Wedding : याआधीही सोनी राझदान यांनी लेक आलियाची सासरी पाठवणी केली आहे.
Alia Ranbir Wedding : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची तयारी जोरात सुरू आहे. काहीवेळातच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. सगळीकडे फक्त आलिया आणि रणबीरच्या लग्नाचीच चर्चा होत आहे. दोघांचे चाहते आता फक्त त्या क्षणाची वाट पाहत आहेत, जेव्हा या दोघांच्या लग्नाचे पहिले छायाचित्र समोर येईल. यावेळी भट्ट आणि कपूर कुटुंबात जल्लोषाचे वातावरण आहे. पडद्यावर आलिया अनेकवेळा वधूच्या वेशात दिसली आहे. पण आता प्रत्यक्षात ती नववधूच्या भूमिकेत दिसणार आहे. रंजक गोष्ट म्हणजे याआधीही आलियाची आई सोनी राझदान यांनी तिची वधूवेशात ‘विदाई’ केली आहे.
हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल, पण याआधीही सोनी राझदान यांनी लेक आलियाची सासरी पाठवणी केली आहे. पण, खऱ्या आयुष्यात नाही, तर रील लाईफमध्ये! वास्तविक, सोनी राजदानने आलियासोबत 'राझी' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटात सोनी यांनी जहाँ तेजी खानची भूमिका साकारली होती. दुसरीकडे, आलियाने त्यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आलियाला तिच्या आईने लग्नात पाठवणी केली होती. या चित्रपटात विकी कौशलने आलियाचा नवरा इक्बाल सय्यदची भूमिका साकारली होती. त्याचवेळी विदाईचे गाणे 'मुड के ना देखो दिलबरो' हिट झाले होते, जे आजही खूप पसंत केले जाते. हे गाणे हर्षदीप कौर, शंकर महादेवन, विभा सराफ यांनी गायले आहे.
आलियाची आई सोनी राझदान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'राझी'च्या या सीनमध्ये त्यांना रडण्यासाठी ग्लिसरीनची गरज नाही. हे गाणे खूप भावूक होते आणि जेव्हा त्या लेक आलियाला निरोप देत होत्या, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते.
हेही वाचा :