Alia Ranbir Wedding : लग्नानंतर आलिया बदलणार आडनाव? रणबीरची आहे 'ही' इच्छा
Alia Ranbir Wedding : अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, 'आलिया लग्नानंतर तिचं आडनाव बदलणार की नाही?'
Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) ही लवकरच रणबीर कपूर रणबीर कपूर (Ranbir Kapoor)सोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नाबाबत नेटकरी सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत आहेत. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, 'आलिया लग्नानंतर तिचं आडनाव बदलणार की नाही?'. आलियाच्या अडनावाबाबत रणबीरची देखील एक खास इच्छा आहे.
रिपोर्टनुसार, आलिया रणबीरसोबत लग्न केल्यानंतर अडनाव बदलून कपूर करणार आहे. कारण रणबीरची आई नीतू कपूर यांनी देखील त्यांचे अडनाव बदललं होतं. ऋषी कपूर यांच्यासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर नीतू सिंह यांनी त्याचं नाव बादलून नीतू कपूर असं केले होते. दो दूनी चार आणि बेशरम यांसारख्या चित्रपटांमध्ये नीतू यांनी त्याचे नाव नीतू कपूर असं मेंशन केलं होतं. आलिया तिचं अडनाव बदलण्यासाठी तयार आहे. पण रणबीरची अशी इच्छा आहे की तिनं नाव बदलू नये. आता आलिया ही तिचं अडनाव बदलेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळेल. रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. 12 एप्रिल रोजी त्यांचे प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात होईल.
आलिया भटकडे भारताचं नागरिकत्व नाही
आलियाचा जन्म मुंबईमध्ये झाला. पण आलियाकडे ब्रिटीश नागरिकत्व आहे. त्यामुळे आलिया भारतामधील निवडणूकीमध्ये मतदान देखील करू शकत नाही. आलियानं नागरिकत्वाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'माझ्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. पुढच्या निवडणूकीमध्ये मी मतदान करेल. तोपर्यंत मला भारताचं नागरिकत्व मिळेल. ' भारतात दुहेरी नागरिकत्वाची व्यवस्था नाही.
हेही वाचा :
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!
- Alia Bhatt, Ranbir Kapoor : रणबीर अन् आलियाच्या लग्नावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...