Alia Bhatt, Ranbir Kapoor : रणबीर अन् आलियाच्या लग्नावर नीतू कपूर यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी रणबीर (Ranbir Kapoor) आणि आलियाच्या (alia bhatt) लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
Alia Bhatt, Ranbir Kapoor : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, हे दोघे 17 एप्रिलला लग्नगाठ बांधणार आहेत. पण अजून आलिया आणि रणबीरनं त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण आता रणबीरची आई अभिनेत्री नीतू कापूर (Neetu Kapoor) यांनी रणबीर आणि आलियाच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
डान्स दिवाने कार्यक्रमाच्या प्रेस कॉन्फरेन्स दरम्यान नीतू सिंह यांना 'रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारिख काय आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'देवालाच माहिती', असं उत्तर दिलं. तर नीतू सिंह यांनी पुढे सांगितलं, 'मला सेलिब्रेट करायचं आहे, लोकांना देखील याबाबत सांगायचंय पण आजच्या पिढीतील मुलं थोडा वेगळा विचार करतात. मला त्यांच्या लग्नाबाबत काहीही माहित नाही. कारण ते दोघे त्यांच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतात. ते कधी लग्न करतील ते माहित नाही पण माझी इच्छा आहे की त्यांनी लवकरच लग्नगाठ बांधावी. आलिया खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांची छान जोडी होऊ शकते. '
नीतू यांनी पुढे सांगितले, 'रणबीर आणि आलियाचा स्वभाव सारखा आहे. रणबीर खूप पॉझिटिवपणे आणि निर्मळ मनानं वागतो तशीच आलिया देखील आहे. ते दोघे कोणाबद्दल देखील वाईट विचार करत नाहित. '
‘हा’ प्रसिद्ध डिझायनर बनवणार आलियाच्या लग्नाचा पेहराव
रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट तिच्या लग्नात सब्यसाची मुखर्जीचा पोशाख परिधान करणार आहे. याआधी कतरिना कैफ-विकी कौशल, करिश्मा तन्ना, मौनी रॉय-सूरज नांबियार, प्रियांका चोप्रा-निक जोनास, दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, अनुष्का शर्मा-विराट कोहली, पत्रलेखा पॉल-राजकुमार राव यांसारखे अनेक सेलिब्रिटींसाठी सब्यासाचीने कपडे डिझाईन केले होते.
हेही वाचा :