एक्स्प्लोर
Advertisement
लॉकडाऊन दरम्यान अक्षय कुमारने मुंबईत केले जाहिरातीचे चित्रीकरण
लॉकडाऊनमुळे चित्रीकरण ठप्प असताना चित्रीकरण कसे काय सुरू? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण अक्षय कुमार करत असलेली जाहीरात केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी चित्रीत केली जात आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली. कोणत्याही चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सध्या होत नाही. अशातच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता एका जाहिरातीचे चित्रीकरण करत आहे. या चित्रीकरणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे चित्रीकरण ठप्प असताना चित्रीकरण कसे काय सुरू? हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण अक्षय कुमार करत असलेली जाहीरात केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी चित्रीत केली जात आहे. कोरोना व्हायरसचा कोणत्याही प्रकारे फैलाव होणार नाही यासाठी जाहिरातीचे शूट करताना सेटवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. या जाहिरातचे दिग्दर्शन अक्षय कुमारच्या 'पॅड मॅन' या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की करत आहेत. या जाहिरातीची निर्मिती बिल आणि मेलिंडस गेट्स यांच्या मेलिंडा फाउंडेशनच्या सहकार्याने केली जात आहे.
या विषयी सांगताना आर. बाल्की म्हणाले, प्रत्येकाला सेटवर एण्ट्री करण्याआधी सॅनेटाइज केले जात आहे. कोरोना पासून बचाव करण्यासाठी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे हे या जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी कमी लोक उपस्थित होते आणि या चित्रीकरणाच्यावेळी सर्व नियम पाळण्यात आले. या प्रकारे कमी लोकांच्या उपस्थितीत आगामी काळात चित्रीकरण केले जाऊ शकते.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement