Web Series Releasing March : अजय देवगणची ‘रुद्रा’ ते विद्या बालनची ‘जलसा’, मार्च महिन्यात ओटीटीववर मनोरंजनाची धूम!
Web Series Releasing March : मार्च महिन्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
Web Series : ओटीटी वर आजच्या काळात प्रेक्षकांसाठी रोज नवीन वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मोठमोठे बॅनर्स देखील त्यांच्या चित्रपटांसाठी OTT हा एक चांगला पर्याय म्हणून विचार करत आहेत. अशा परिस्थितीत, मार्च महिन्यात देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
अनदेखी सीझन 2
4 मार्च रोजी ‘अनदेखी’ या वेब सिरीजचा सीजन 2 रिलीज होईल, जी तुम्ही सोनी लिव्हवर पाहू शकता.
रुद्र
अजय देवगण आणि ईशा देओल या सहा भागांच्या सिरीजमध्ये दिसणार असून, अजय पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगण ‘रुद्र’ वेब सिरीजद्वारे ओटीटीच्या जगात प्रवेश करत आहे. ही सिरीज डिस्ने+हॉटस्टारवर 4 मार्च रोजी प्रदर्शित होईल.
जलसा
विद्या बालन आणि शेफाली शाह यांचा 'जलसा' हा चित्रपट 18 मार्च रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होत आहे. सुरेश त्रिवेणी दिग्दर्शित या थरारपटाची कथा पत्रकार आणि शेफ यांच्या संघर्षाची कथा आहे.
वंडरलस्ट
रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या सिरीजमध्ये दिसणार आहेत. 'वंडरलस्ट' नावाच्या या सिरीजमध्ये एकूण 4 भाग आहेत. हा एक ट्रॅव्हल शो आहे, ज्यामध्ये हे स्टार्स अबू धाबीच्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसणार आहेत.
अपहरण 2
'सबका काटगी दोबारा’ या टॅगलाइनसह एकता कपूरची ‘अपहरण 2’ ही वेब सिरीज पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या या सिरीजमध्ये अरुणोदय सिंह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा :
- Gangubai Kathaiwadi Collection Day 4 : बॉक्स ऑफिसवर ‘गंगुबाई काठियावाडी’ची जादू, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला!
- Maha Shivratri 2022: हेमा मालिनी, कंगना रनौत, मौनी रॉयसह 'या' अभिनेत्रींनी दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
- Mahesh Manjrekar : ‘पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका’, महेश मांजरेकरांना हायकोर्टाचा मोठा दिलासा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha