Sushant Singh Rajput: अखेर अंकिताला भावना अनावर; सुशांतसोबतच्या आठवणी शेअर करत म्हणाली...
सुशांतच्या जवळच्या अनेक व्यक्तींसाठी दरम्यानचा काळ ही बाब पचवण्यास अत्यंत कठीण होती. पण...
Sushant Singh Rajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचं एकाएकी या जगाचा निरोप घेणं विश्वास ठेवण्यायोग्य नसलं तरीही आता ही बाब अनेकांनीच स्वीकारली आहे. सुशांतच्या जवळच्या अनेक व्यक्तींसाठी दरम्यानचा काळ ही बाब पचवण्यास अत्यंत कठीण होती. पण, अखेर धीर एकवटत त्यांनी आयुष्याचा गाडा पुढे लोटण्याचा निर्धार केला. सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि त्याची एक चांगली मैत्रीण, अभिनेत्री अंकिता लोखंडे ही त्यापैकीच एक.
सुशांतला जाऊन एक वर्ष झालं आणि सोशल मीडियावर सक्रिय असणारी अंकिता या क्षणी नेमकी कशी व्यक्त होते याकडेच साऱ्यांचं लक्ष होतं. काहींनी तिच्या एक- दोन दिवसांपूर्वीच्या पोस्टचा संबंधही सुशांतशी लावला. अखेर अंकितानं या सर्व वातावरणात तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
अंकितानं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये तिनं सुशांतसोबतचे शक्य तितके सर्व क्षण, सर्व आठवणी एकवटल्या. हा होता आमचा प्रवास... असं लिहित तिनं 'फिर मिलेंगे चलते चलते' म्हणत सुशांतचा जणू पुन्हा नक्की भेटू हं.. असं आपलेपणाचं वचनच दिलं आहे.
Sushant Singh Rajput: सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष
View this post on Instagram
सुशांतच्या जाण्यामुळं अर्थातच अंकिताच्या जीवनातही मोठी पोकळी निर्माण झाली. रिलेशनशिपमध्ये वादळ आलेलं असलं तरीही या दोघांमधली मैत्री मात्र कायम होती. त्यामुळं ही जोडी कायमच प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक ठरली.
सुशांत हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत होता. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या निमित्तानं झळकलेला सुशांत सहकलाकार अंकिता लोखंडे हिच्यासोबत काही वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होता. काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या या नात्याला गालबोट लागलं आणि दोघांनीही आपल्या वाटा बदलल्या.