Sushant Singh Rajput: सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिताच्या सोशल मीडिया पोस्टनं वेधलं लक्ष
'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या निमित्तानं झळकलेला सुशांत सहकलाकार अंकिता लोखंडे हिच्यासोबत काही वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होता
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आणि सोशल मीडियापासून ते अगदी कलावर्तुळापर्यंत सर्वत्र सुशांतच्याच नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. सुशांत हा त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळंही चर्चेत होता. 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या निमित्तानं झळकलेला सुशांत सहकलाकार अंकिता लोखंडे हिच्यासोबत काही वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होता. काही वर्षांनंतर मात्र त्यांच्या या नात्याला गालबोट लागलं आणि दोघांनीही आपल्या वाटा बदलल्या.
सुशांतच्या प्रथम स्मृतीदिनी अंकिता काय पोस्ट करते याकडेच सर्वांचं लक्ष असतानाच, तिनं पोस्ट केलेल्या एका फोटोच्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधलं. समुद्रकिनारी, दाटून आलेल्या आभाळाखाली उभी असणारी अंकिता या फोटोत दिसली. या फोटोला तिनं कॅप्शन देत लिहिलं, 'अंतर किती आहे हे महत्त्वाचं नाही, कारण शेवटी आपण सगळेच या एकाच खुल्या नभाखाली आहोत'. अंकितानं लिहिलेलं हे कॅप्नश सुशांतला अनुसरुन असल्याचता अंदाज लावत अनेकांनीच तिच्या या कमेंटवर कमेंट करण्यास सुरुवात केली.
Sushant Singh Rajput: 'रामलीला'पासून 'हाफ गर्लफ्रेंड'पर्यंत चित्रपटांसाठीची पहिली पसंती होता सुशांत
इतकंच नव्हे तर अंकितानं तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती एक होम करताना दिसत असून, प्रार्थनेत मग्न असल्याचं कळत आहे. अंकिता या व्हिडीओमध्ये दिसत नसली तरीही होम सुरु असल्याचं यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.
View this post on Instagram
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिताची जोडी चाहत्यांच्या विशेष आवडीची होती. ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन केमिस्ट्रीच्या बाबतीतही ही जोडी सुपरहिट होती. त्यांच्या नात्यात दुरावा येऊनही या दोघांनीही नात्याचा आणि खासगी आयुष्यातील गोपनीयतेचा आदर ठेवत एकमेकांना कायमच सन्मानानं वागवलं होतं.