एक्स्प्लोर
Advertisement
Lok Sabha Elections 2019 : मतदान ओळखपत्र नसेल तर काय कराल?
तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तरीही तुम्हाला मतदान करता येणार आहे. अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
मुंबई: देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे.
महाराष्ट्रात विदर्भातल्या सात मतदारसंघांसह देशभरातील 91 जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासह पोलीस, प्रशासन आणि राजकीय पक्षही चांगलेच तयारीत आहेत.
जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तरीही तुम्हाला मतदान करता येणार आहे. अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालक परवाना)
- पासपोर्ट (पारपत्र)
- छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
- मनरेगा कार्यपत्रिका
- कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
- छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
- छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
- राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
- खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्यांसाठी त्यांना दिलेलं ओळखपत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement